शंभर गुन्हेगार सुटले तरी एका निर्दोष व्यक्तीला मात्र शिक्षा व्हायला नको, असं तत्व भारतीय न्यायव्यवस्थेसाठी वापरलं जातं. मात्र उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीला विनाकारण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली. दोन किंवा चार नाही तर तब्बल २६ वर्ष त्याला या आरोपानं छळलं. अखेर नुकतीच त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र पोलीस ठाणे आणि कोर्टाच्या पायऱ्या चढून चढून त्याचं आयुष्य वाया गेलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलीम राजपूत हा २० वर्षांचा असताना २५ जुलै १९९९ रोजी मुझफ्फरनगर येथे कामावरू घेरी येत होता. त्यावेळी तीन पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याच्याकडे चोरीचा माल असल्याचं सांगून अटक केली. या आरोपामुळं सलीमला धक्काच बसला. पण अतिशय हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्याला याविरोधात जामीन घेता आला नाही. तब्बल दोन महिने तुरूंगात काढल्यानंतर त्याला जामीन मिळाला. तेव्हापासून आजवर २६ वर्ष त्याचा खटला सुरूच होता. आतापर्यंत २०० हून अधिक सुनावण्यांना तो हजर राहिला आहे.

४ फेब्रुवारी रोजी सलीमच्या मागचे शुक्लकाष्ठ संपले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी साक्षी-पुराव्यांच्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता केली.

सलीम राजपूत आता ५० वर्षांचा आहे. जरी या निकालामुळे त्याला दिलासा मिळाला असला तरी त्यासाठी त्याला आयुष्यातील उमेदीचा काळ वाया घालावा लागला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सलीम म्हणाला की, आता या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्याची परिस्थिती नाही. या खोट्या खटल्यामुळे माझे आयुष्य उध्वस्त झालं. माझी मिळकत संपली. माझ्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अनेक वर्ष मी कोर्ट कचेरीतच घातले.

सलीम पुढे म्हणाला, माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. जेव्हा अटक झाली तेव्हाच माझे लग्न झाले होते. आता त्याला चार मुले आहेत.