Fake Cow Slaughter Case: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, पोलिसांनी नुकतेच ३६ वर्षीय गोरक्षकाला एका मांस व्यापाऱ्याला गोहत्येच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याबद्दल अटक केली. आरोपी विश सिंग कंबोज याने टिपू कुरेशी या मांस व्यापाऱ्याकडून ५०,००० रुपये घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान टिपू कुरेशी आणि पीडित मांस व्यापारी हे व्यावसायिक भागिदार होते. पण काही कारणांमुळे ते वेगळे झाल्याने टिपू कुरेशी पीडित व्यापाऱ्याला खोट्या गुन्हा अडकवू इच्छित होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सारसावा पोलीस ठाण्याचे प्रमुख नरेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी विश सिंग कंबोजने त्याच्या साथीदारांसह मंगळवारी जिल्ह्यातील एक प्रमुख महामार्गावर गोवंशाचे अवशेष टाकले आणि त्यानंतर कथित गोहत्येविरोधात पोलीस कारवाईची मागणी केली.”

पोलिसांनी असा उधळला कट

नरेंद्र शर्मा पुढे म्हणाले की, “महामार्गावरील गोवंशाचे अवशेष खूप जुने दिसत होते, त्यामुळे याबाबत आम्हाला संशय आला. त्यानंतर चौकशी केली असलता विश्व हिंदू परिवाराचा संस्थापक विश सिंग कंबोज याने परस्परविरोधी विधाने केल्याचे आढळले. यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्याने कबूल केले की टीपू कुरेशी यांच्या सांगण्यावरून त्याने गोवंशाचे सांगाडे रस्त्यावर टाकून कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.” याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

प्रतिस्पर्ध्याला तुरुंगात टाकण्याचा हेतू

पोलिसांनी सांगितले की, कुरेशी आणि पीडित दोघेही मांस व्यापारी आहेत, परंतु पीडित व्यक्ती व्यवसाय आरोपीपेक्षा चांगला चालायचा. यामुळे आरोपी कुरेशीने त्याच्याविरुद्ध कट रचला. पोलीस प्रमुख शर्मा पुढे म्हणाले, “गोहत्येच्या प्रकरणांची संवेदनशीलता पाहता, न्यायालये देखील जामीन देण्यास कचरतात. कुरेशीने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा स्वतःचा व्यवसाय भरभराटीला यावा म्हणून त्याच्या प्रतिस्पर्ध्याला तुरुंगात टाकण्याचा आरोपीचा हेतू होता.”

प्रमुख आरोपी फरार

या प्रकरणातील प्रमुख आरोपी टीपू कुरेशी सध्या फरार आहे. पण पोलिसांनी पीडित व्यक्तीचे नाव उघड केले नाही. सहारनपूरचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक रोहित सिंग सजवान म्हणाले, “कथित गोहत्येविरोधात कारवाईची मागणी करणारा कंबोज हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध दंगलीसह सात विविध गुन्हे दाखल आहेत.”

Story img Loader