man shaves wifes head for protesting verbal abuse Crime News : उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने शिवीगाळ करण्यास विरोध केला म्हणून पत्नीवर हल्ला करत तिचे मुंडन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली. औराई पोलीस ठाण्यातील इन्स्पेक्टर अंजनी कुमार राय यांनी सांगितले की ही घटना बडा सियूर गावात २४ एप्रिल रोजी घडली.

मध्यरात्री एकच्या सुमारास राम सागर या व्यक्तीने वाद सुरू असताना त्याची पत्नी बबीता (२९) हिच्याशी बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. बबिताने यावर जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्यावर शारीरिक हल्ला केला आणि धारदार शस्त्राने तिचे केस काढायला सुरुवात केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी बबिताने तिची आई उर्मिला देवी यांना याबद्दल सांगितले, आणि तीच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. रविवारी संथध्याकाळी बबिता तिच्या आई बरोबर औराई पोलीस ठाण्यात गेली आणि तिने अधिकृत तक्रार दाखल केली, तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

यानंतर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत