‘यूपी में का बा’ हे गाणं गाऊन प्रसिद्ध झालेली गायिका म्हणजे नेहा सिंह राठोड. तिच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेहा राठोडचं नवं गाणं हे आपलं गाव आणि शहर सोडून बाहेर जाणाऱ्या मजुरांवर हे गाणं आलं आहे. हा व्हिडिओ नेहा सिंहने ट्विटरवर शेअर केला आहे. करके दिल्ली में मजूरिया हम कमात बानी हो असं कॅप्शन देण्यात आलं आहे. #Nehasingrathore, #Bhojpurigeet, #प्रवासीमजबूर असे हॅशटॅग्ज वापरले आहेत. या गाण्यातून नेहा सिंह राठौडने पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहा सिंह राठोड युपी मे का बा या गाण्यामुळे चर्चेत आली होती. तसंच तिने उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणी राजकारणही रंगलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मीडिया सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी नेहा सिंह राठोड पब्लिसिटी स्टंट करत असल्याचं म्हटलं होतं.तसंच या गाण्याला काऊंटर करणारं दुसरं गाणंही भाजपाने समोर आणलं आहे.

कोण आहे नेहा सिंह?

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात राहणाऱ्या नेहा सिंह राठोडचा जन्म १९९७ मध्ये झाला होता. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दरम्यान नेहाचं यु. पी. मे का बा? हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. यानंतर नेहाने याच गाण्याचे दोन पार्ट तयार केले होते. बिहारमध्ये जन्मलेल्या नेहाने तिचं शिक्षण बिहारमध्येच घेतलं आहे. तसंच कानपूर विद्यापीठातून तिने पदवी घेतली आहे. २०१८ मध्ये तिने गायिका म्हणून आपल्या लोकगीत गाण्याच्या कलेला सुरूवात केली. सामाजिक विषयांवर गाणारी गायिका म्हणून नेहा सिंह अल्पावधीत लोकप्रिय झाली. ब्लाऊज हुक आणि लेहंगा स्ट्रिंग या प्रकारातून भोजपुरी गाणी बाहेर काढणं तिला आवश्यक वाटतं. तसंच चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ती घरापासून दूर वाराणसीत एका हॉस्टेलमध्येही राहिली होती. बिहारच्या खेड्यात मुलींचं काही चालत नाही. त्यांना बोलण्याची इच्छा असते पण बोलू दिलं जात नाही ऐकून घेतलं जात नाही. मला हा दृष्टीकोन बदलायचा होता म्हणून मी गाणं शिकले असंही नेहाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

नेहा सिंह यांची कोणती गाणी प्रसिद्ध झाली आहेत?

नेहा सिंह यांचे ‘रोजगार देबा कि करबा ड्रामा’ हे गाणे समाजमाध्यमांवर खूपच प्रसिद्ध झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बेरोजगार तरुणांचे प्रश्न या गाण्यातून मांडण्यात आले होते. ‘यूपी में का बा?’ या गाण्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या. करोनाकाळातील व्यवस्था, हाथरस हत्याकांड आदी गंभीर मुद्दे त्यांनी या गाण्यातून मांडले. त्याशिवाय लखीमपुरीतील शेतकऱ्यांचा मृत्यू आणि करोनाकाळात गंगेत सापडलेले मृतदेह यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या गाण्यांत मांडून त्यांनी भाग दोन आणि तीनही प्रसिद्ध केले. २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी ‘बिहार में का बा’ हे गाणे प्रसिद्ध केले. त्यात बिहारमधील समस्यांवर त्यांनी बोट ठेवले होते. त्यानंतर राठोड यांनी सुमारे २०० गाणी प्रसिद्ध केली असून ज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार, मजूर व शेतकऱ्यांचे प्रश्न, टाळेबंदीदरम्यान झालेले स्थलांतर यांवर भाष्य केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up mein ka ba singer neha singh rathore new song viral on social media users scj
Show comments