वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीच्या आरोपावरून अटक केलेले उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार महेंद्र सिंग यांनीच त्यांच्यासोबत सहा मुलींना तिथे आणले होते. या मुलींसोबतच महेंद्र सिंग कलंगुट परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलेदेखील होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आलीये. पणजीचे पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांनी ही माहिती दिली. 
पणजीतील एका इमारतीत सुरू असलेल्या डान्सबारमधील वेश्याव्यवसाय रॅकेटचा गोवा पोलिसांनी भंडाफोड केला. संबंधित डान्सबारमधून पोलिसांनी सहा तरुणींची सुटका केली केली आणि सहा जणांना अटक केलीये.
पणजीतील कॅम्पल भागातील एका इमारतीमध्ये सोमवारी रात्री गोवा पोलिसांनी छापा टाकला. संबंधित इमारत खासगी मालमत्ता असली, तरी तिच्या टेरेसवर डान्सबार होता. २० ते ३० वयोगटातील मुले तिथे डान्स करीत होत्या. महेंद्र सिंग यांनी पंजाब, दिल्ली, मुंबई, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशमधून संबंधित मुलींना तिथे आणले होते.
पोलिसांनी महेंद्र सिंग यांच्यासोबत अजय प्रदेश सिंग, धर्मेंद्र प्रसाद यांना अटक केली आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील आहेत. याशिवाय पोलिसांनी कोमल थापा, संजीव साह आणि बाबू घंटा यांनादेखील अटक केली आहे. अटक केलेल्यांवर वेश्याव्यवसाय विरोधी कायदा आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader