उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाचारानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. विरोधीपक्षांकडून पीडित कुटुंबांना भेटण्याचा प्रयत्न होतोय, मात्र उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना रोखलं जातंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसोबत तर धक्काबुक्कीचेही आरोप झाले. आता भाजपच्या माजी खासदाराचे केस ओढून धक्के मारत पोलीस गाडीत लोटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्वतः प्रियंका गांधी यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट करत या घटनेचा निषेध केलाय.

भाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले (BJP Ex MP Savitri Bai Phule) लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचे केस ओढत, धक्के मारत पोलीस गाडीत घातल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांच्या या गैरव्यवहारावरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर जोरदार टीका होतेय. प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ रिट्विट करत म्हटलं, “सावित्री तुमच्यासोबतचं हे वर्तन पाहून दुःख झालं. टिकून राहा, लढत राहा.”

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

खैराच्या लाकडांची चोरी आणि नेपाळमध्ये खतांची तस्करी करणारा गृहमंत्री झाला…, राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

सावित्रीबाई यांच्यासोबतच्या पोलीस गैरव्यवहाराच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिलं, “या कुणी सामान्य महिला नाहीत तर माजी आमदार आणि माजी खासदार आहेत. त्या शेतकऱ्यांच्या प्रति आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी लखीमपूरला जात होत्या हाच त्यांचा दोष आहे.”

कोण आहेत सावित्रीबाई फुले?

सावित्रीबाई फुले यांचं वयाच्या ६ व्या वर्षीच लग्न झालं होतं, मात्र सज्ञान झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. सावित्रीबाई फुले यांना २०१२ मध्ये भाजपने बलहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सावित्रीबाई ही निवडणूक जिंकल्या. यानंतर २०१४ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. त्यांनी ही निवडणूक जिंकत खासदार म्हणून संसदेत पाऊल ठेवलं.

लखीमपूर खेरी इथली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड – शरद पवार

सावित्रीबाई फुले भाजपचा अनुसूचित जातीतील महत्त्वाचा महिला चेहरा मानला जात होत्या. मात्र, ६ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी लखनऊमध्ये भाजपवर समाजात फूट पाडण्याचा आरोप करत पक्ष सोडला. त्यानंतर त्यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वर्षभरात त्यांनी काँग्रेसमध्ये आपला आवाज ऐकला जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी कांशीराम बहुजन समाज पक्षाची स्थापना केली.

Story img Loader