उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या दिशेने पावलं पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्य विधि आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा मसुदा तयार केला आहे. या नियमांनुसार राज्यात दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना सरकारी नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारी योजनांचाही लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आयोगाने हा ड्राफ्ट http://upslc.upsdc.gov.in/ वेबसाइटवर अपलोड केला आहे. १९ जुलैपर्यंत यावर लोकांची मत मागवण्यात आली आहे. जागतिक लोकसंख्या दिवसाचं औचित्य साधत उत्तर प्रदेशात Population Policy लागू करणार आहे. अशात विधि आयोगाने मसुदा समोर केला आहे. मात्र हा मसुदा स्वंयप्रेरणेनं केला असल्याचा दावा विधि आयोगाने केला आहे. उत्तर प्रदेशातील मर्यादित साधनसामुग्री आणि वाढती लोकसंख्येमुळे हे पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे, असं स्पष्टीकरण विधि आयोगाने दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा