विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने शिक्षिकेने एका विद्यार्थ्यास दसऱ्या विद्यार्थ्याला कानाखाली मारण्यास सांगितले असल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगरमधून समोर आला आहे. याप्रकरणी या शाळेतील शिक्षिकाला अटक करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
२६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. इयत्ता पाचवीत हा विद्यार्थी शिकतो. साजिष्टा नावाच्या शिक्षिकेने हिंदू विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारले. या प्रश्नाचं उत्तर देण्यास तो असमर्थ ठरला. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने त्याचा सहकारी वर्गमित्र मुस्लीम विद्यार्थ्याला हिंदू विद्यार्थ्याच्या कानाखाली वाजवायला सांगितली. यामुळे विद्यार्थ्याला नैराश्य आल्याने त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला.
हेही वाचा >> Ujjain Rape Case : पीडिता मानसिक रुग्ण, एकटी फिरत असताना नराधमाने गाठले; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
त्याच्या वडिलांना या घटनेबाबत कळल्यानंतर त्यांनी तत्काळ २७ सप्टेंबर रोजी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसंच, तपासानंतर पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी शिक्षिकेला अटक केली, तर शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिला निलंबित केले.
गेल्या महिन्यात मुझफ्फरनगरमध्ये एका खासगी शाळेत असाच प्रकार घडला होता. परंतु, या घटनेत एका मुस्लीम वर्गमित्राला थप्पड मारण्यात आली होती. याप्रकरणीही मोठा वादंग निर्माण झाला होता. याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला असून संबंधित शाळेला टाळे ठोकण्यात आले आहे.