उत्तर प्रदेशातल्या गोठवा गावातल्या आराध्या त्रिपाठी नावाच्या मुलीला गुगलने ५२ लाखांचं पॅकेज दिलं आहे. आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयआयटीमधून तिचं शिक्षण झालेलं नसतानाही गुगलने या मुलीला ५२ लाखांचं पॅकेज दिलं आहे. आराध्या त्रिपाठी असं या मुलीचं नाव आहे ती उत्तर प्रदेशातल्या गोठवा गावातली रहिवासी आहे.

गोठवा या गावात राहणाऱ्या आराध्या त्रिपाठीचं शिक्षण मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठातून झालं आहे. गुगलने तिला ५२ लाखांचं पॅकेज दिलं आहे. मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला आत्तापर्यंत इतकं मोठं पॅकेज मिळालेलं नाही त्यामुळे आराध्याची ही कामगिरी रेकॉर्डब्रेक ठरली आहे.

एका छोट्या गावातून गुगल पर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. आराध्याचे वडील वकील आहेत तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच आराध्याला अभ्यासाची खूप आवड होती. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे वळली. त्यानंतर बीटेक झाल्यानंतर आराध्याने एमएमएमयूटीमध्ये प्रवेश घेतला. विद्यापीठासह या क्षेत्रात तिने मोलाची कामगिरी करुन दाखवली. Google मध्ये तिने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम केलं.

आराध्याने तिची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर स्केलरने तिला ३२ लाखांचं पॅकेज ऑफर केलं होतं. मात्र त्याला तिने नकार दिला. स्केलर कंपनीत तिने तिची एंटर्नशिप पूर्ण केली होती. ज्यानंतर गुगलने तिला ५२ लाखांचं पॅकेज दिलं आहे. तसंच तिला सॉफ्टवेर डेव्हलमेंट इंजिनिअर हे पदही ऑफर केलं आहे. आराध्याच्या LinkedIn प्रोफाईलनुसार तिला Recat.JS, React Redux, NextJs, Typescript, NodeJs, MongoDb, ExpressJS आणि SCSS या तंत्रज्ञानाची माहिती आणि अनुभव आहे.

Story img Loader