उत्तर प्रदेशमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. बहिणीचे प्रेमप्रकरण भावाला मान्य नव्हते. त्याच रागातून भावाने बहिणीचा खून केला आहे. पहिल्यांदा भावाने बहिणीचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर ते शीर घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहचला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

फतेहपूर परिसरातील मिथवारा गावात ही घटना घडली आहे. रियाज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर, चांद बाबू असं बहिणीच्या प्रियकारचं नाव आहे.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video

हेही वाचा : धक्कादायक: दिल्लीत २६ वर्षीय फॅशन डिझायनर तरुणी आढळली मृतावस्थेत

काही दिवसांपूर्वी तरुणी प्रियकर चांद बाबूबरोबर पळून गेली होती. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चांद बाबूला अटक करत तरुणीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं होतं.

हेही वाचा : सीमा हैदर भारतात कशी आली? उत्तर प्रदेश एटीएस पथकाकडून सखोल चौकशी, गुप्तहेर असल्याचा संशय!

अशातच आरोपी रियाज आणि बहिणीमध्ये जोराचे भांडण झाले. हा वाद एवढा टोकाला गेला की, रागाच्या भरात रियाजने बहिणीचं शीर धडावेगळं केलं. नंतर बहिणीचे शीर घेऊन रियाज पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी रियाजला अटक केली आहे. तसेच, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिलं आहे.