उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना २१ वर्षीय तरुणानं स्वतःचं जीवन संपवलं. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशी करण्यासाठी तरुणाचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. तसेच संबंधित प्रेयसीचीही आता चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, सदर तरुण वर्षभरापासून एका युवतीच्या प्रेमात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुण आणि त्याची प्रेयसी एक वर्षापासून एकमेकांशी संबंधात होते. मात्र मुलीच्या घरच्यांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता. मंगळवारी (२४ डिसेंबर) तरुणाने प्रेयसीला फोन केला. जवळपास पाच तास ते दोघे एकमेकांशी बोलत होते. यावेळी दोघांमध्ये अचानक शाब्दिक खटके उडाले. ज्यामध्ये तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

हे वाचा >> ‘मला माफ कर, मी चुकीचं पाऊल उचलतेय’, प्रियकराला व्हिडीओ संदेश पाठवत तरुणीची आत्महत्या

प्रेयसीने अडविण्याचा प्रयत्न केला पण…

अमर उजालाने दिलेल्या बातमीनुसार, सदर तरुणाचे नाव असगर अली (२१) असून तो इलेक्ट्रिशियनचं काम करत होता. जेव्हा प्रेयसीशी भांडण झाल्यावर त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रेयसीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, पण तरुणाने तिचं काहीच ऐकलं नाही. यानंतर प्रेयसीने तरुणाच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईक त्वरीत त्याच्या खोलीकडे धावत गेले. दरवाजा आतून बंद असल्यामुळं त्यांनी दरवाजा तोडला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा >> काहींची आत्महत्या, तर काहींना हृदयविकाराचा झटका; २०२४ मध्ये ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे झाले निधन

आत्महत्या सारख्या प्रकरणांमध्ये देशभरात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यातही विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा अहवाल मध्यंतरी समोर आला होता. “विद्यार्थी आत्महत्या: भारतात वेगाने पसरणारी महामारी” (Student Suicides: An Epidemic Sweeping India) या शीर्षकाचा अहवाल ऑगस्ट २०२४ मध्ये वार्षिक आयसी३ परिषद आणि एक्स्पोमध्ये सादर करण्यात आला होता. अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

Story img Loader