केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित ही श्वेतपत्रिका आहे. १ फेब्रुवारी रोजी त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर १० वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक प्रगतीची श्वेतपत्रिका लोकसभेत सादर करण्यात आली. मी आज भारतीय अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये पटलावर ठेवते आहे असा उल्लेख त्यांनी केला. तसंच २०१४ च्या आधी देशाची अर्थव्यवस्था संकटात होती असाही उल्लेख श्वेतपत्रिकेत आहे.
श्वेतपत्रिकेत काय उल्लेख?
UPA चा दहा वर्षांचा कार्यकाळ नॉन परफॉर्मिंग होता असाही उल्लेख या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे. या श्वेतपत्रिकेवर शुक्रवारी चर्चा होणार आहे. तसंच राज्यसभेत शनिवारी चर्चा होईल. श्वेत पत्रिकेद्वारे हे सांगण्यात आलं की २०१४ नंतर मोदी सरकारला कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला. तसंच या आव्हानांचा सामना करुन अर्थव्यवस्था कशी रुळावर आणली याचा उल्लेखही श्वेतपत्रिकेत उल्लेख आहे.
श्वेतपत्रिकेत यूपीएचे वाभाडे
श्वेतपत्रिकेत उल्लेख आहे की यूपीएच्या काळात देशाचा आर्थिक पाया खिळखिळत केला. भारतात रुपया घसरला तोदेखील यूपीएच्या काळातच. २०१४ च्या आधी देशाच्या बँकिंग सेक्टरवर मोठं संकट आलं होतं. यूपीए सरकारने मिळालेल्या महसुलाचा चुकीचा वापर केला. असाही उल्लेख श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.
श्वेतपत्रिकेत कोळसा घोटाळ्याचाही उल्लेख
श्वेतपत्रिकेत कोळसा घोटाळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार येण्याआधी कोळसा घोटाळा झाला. त्या घोटाळ्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली.
सरकारच्या श्वेतपत्रिकेत हा उल्लेख आहे की २०१४ मध्ये एनडीएकडे सत्ता आली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था फक्त वाईट स्थितीत नव्हती तर संकटात होती. आम्हाला संकटग्रस्त अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला.
२०१४ च्या आधी १२ दिवस ज्या राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या त्यातही घोटाळा झाला. आमच्या सरकारने दहा वर्षांमध्ये प्रगती केली आहे. यूपीए काळातली दहा वर्षे संथगतीची, दिशाहिनतेची होती. आम्ही त्या सगळ्या गोष्टी दूर केल्या असाही उल्लेख ६९ पानी श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.