ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत संयुक्त पुरोगामी आघाडीतील (यूपीए) ज्यांनी पैसे घेतले त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. ते शनिवारी देहरादून येथील कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. ऑगस्टा व्यवहारात कोणी पैसे घेतले या वादग्रस्त प्रश्नाचे उत्तर दिलेत पाहिजे. हा व्यवहार झाला तेव्हा प्रमुखपदावर असलेल्या व्यक्तींना स्पष्टीकरण देणे भाग आहे. इटालियन न्यायालयाने याप्रकरणात १२५ कोटींची लाच दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. न्यायालयाने यामधील काही नावेही जाहीर केली आहेत. त्यामुळे तत्कालीन यूपीए सरकारला आता उत्तर देणे भागच आहे, असे पर्रिकर यांनी म्हटले.
या व्यवहारात कुणाला आणि किती पैसे मिळाले, हे चौकशीदरम्यान स्पष्ट होईलच. मात्र, मुळात या व्यवहाराला मंजुरी कशी मिळाली आणि एखाद्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या हेतुपूर्वक प्रयत्नांबद्दल तत्कालीन सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे पर्रिकर यांनी सांगितले.
ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या AW१०१ व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाला असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी/दलालांनी आपली हेलिकॉप्टर विकली जावीत म्हणून भारतातील उच्चपदस्थांना लाच दिल्याचे मिलान उच्च न्यायालयाने ८ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आपल्या २२५ पानी न्यायपत्रात म्हटले होते. लाच घेणाऱ्या भारतीयांमध्ये केवळ माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख असला तरी या न्यायपत्राला जोडलेल्या पुरवणी कागदपत्रांत (annexure) कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये भूकंप झाला होता.
ऑगस्टा व्यवहारात कुणाला पैसै मिळाले याचे उत्तर ‘यूपीए’ला द्यावेच लागेल- पर्रिकर
इटालियन न्यायालयाने याप्रकरणात १२५ कोटींची लाच दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
First published on: 30-04-2016 at 13:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upa must answer who received kickbacks in agusta deal says manohar parrikar