Suchana Seth Who Killed 4 Year Old Son Threatens Husband: चार वर्षांच्या मुलाच्या हत्येचा आरोप असणारी भारतीय स्टार्टअपची सीईओ सूचना सेठ सध्या पोलीस कोठडीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अलीकडेच सूचना सेठ व तिचा पती व्यंकट रमण हे कळंगुट येथे पोलीस स्थानकात समोरासमोर आले. यावेळी या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. सूचना हिने व्यंकटला आपल्या अवस्थेसाठी दोषी ठरवत पोलिसांच्या समोरच धमकी दिल्याचे सुद्धा टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार सूचना व व्यंकट दोघांनी सुद्धा एकमेकांना भेटण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. यानुसार दोघांना १५ मिनिटांसाठी भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. यानंतर दोन तासांनी पोलिसांनी व्यंकटचा पाच पानांचा जबाब नोंदवला. व्यंकट याने पोलिसांना सांगितल्यानुसार सूचनाला नेहमी तो (व्यंकट) हिंसक आहे असे वाटायचे शिवाय तिला ही भीती होती की व्यंकट त्यांच्या मुलाला घेऊन निघून जाईल. २०२३ मध्ये तिने बंगळुरू मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती व त्यांचे राहते घर सोडून ती मुलाला घेऊन निघून गेली होती.

पोलिसांच्या हवाल्याने टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्यंकट आणि सूचना यांच्यात वाद होऊ लागताच दोघेही खूप भडकले होते. व्यंकटने तिला “तू असं का केलंस?” विचारलं असता सूचनाने आपण खून केल्याचा दावा फेटाळून लावला शिवाय तिच्या या अवस्थेसाठी सुद्धा तिने व्यंकटला दोषी ठरवले. रमणने यावर उलटप्रश्न करत विचारले की, “जर तू आपल्या मुलाला मारलं नसेल तर मग त्याचा मृत्यू कसा झाला.” पुढे सूचना म्हणाली की, “जोपर्यंत मी पोलीस कोठडीत आहे तोपर्यंत तू मोकळा आहेस.”

व्यंकट रमणला किंवा त्याच्या मुलाला न्याय नको तर..

रमण यांचे वकील अझहर मीर यांनी सांगितले की, “माझ्या अशिलाचा आता स्वतःसाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्नच नाही. आता ना त्याच्या मुलाला न्याय मिळणार आहे ना व्यंकटला. पण या प्रकरणातुन जे काही साध्य होईल ते त्या सर्व मुलांसाठी आहे ज्यांचे आयुष्य पालकांच्या भांडणामध्ये अडकले आहे आणि त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणानंतर, लोकांना हे समजेल की मुलासाठी लढणे फायदेशीर नाही. अशा परिस्थितीत, आई किंवा वडील जरी लढाई जिंकले तरी मुलाचा प्रत्येक वेळी पराभवच होतो.”

हे ही वाचा<< सूचना सेठने चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा उलगडा कसा झाला?

वकिलांनी सांगितले की, सुचनाला शिक्षा झाली, कोठडीत राहिली किंवा जामीन मिळाला तरी रमणला काही फरक पडणार नाही. ७ जानेवारी रोजी रमण सुचनाने आपल्या मुलाला घेण्यासाठी बोलावले होते त्या ठिकाणी गेला, मात्र ती आधीच गोव्याला निघून गेली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Update suchana seth who killed 4 year old son threatens husband meets for first time after murder says you are free svs
Show comments