सरकारने दुधाची भुकटी, डेअरी व्हाइटनर या दुग्धजन्य पदार्थावरील निर्यात बंदी उठवली आहे. या दुग्धजन्य पदार्थाची अतिरिक्त उपलब्धता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयाने याबाबत अधिसूचना काढली असून त्यात असे म्हटले आहे की, दूध, क्रीम (मलई), दुधाची भुकटी, डेअरी व्हाइटनर व लहान बाळांसाठीची दुग्धजन्य उत्पादने यावरील निर्यात बंदी उठवण्यात येत आहे.
आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने याबाबत निर्णय घेतल्यानंतर निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. स्कीम्ड मिल्क पावडरच्या बाबतीत मात्र धोरणात कुठलाही बदल केलेला नाही. फेब्रुवारी २०११ मध्ये सरकारने स्किम्ड मिल्क पावडर, पूर्ण दूध पावडर, डेअरी व्हाइटनर, इनफँट मिल्क फूड्स, कॅसिन व तत्सम पदार्थ यावर निर्यात बंदी लादली होती. सध्या देशात दूध भुकटीचा १.१२ लाख टन इतका साठा पडून आहे. सप्टेंबर महिन्यात देशात दिवसाला ३०० लाख किलोलिटर दूध उत्पादन झाले व दिवसाची विक्री २६० लाख किलो  इतकी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा