UPI Server Down : पेटीएम संकटात आहे अशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय पेमेंट्स चा सर्व्हर मंगळवारी सातत्याने डाऊन झालेला होता. त्यामुळे अनेक युजर्स युपीआयमधून बँकेचे व्यवहार करु शकले नाहीत. एचडीएफसी, कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा यांसह अनेक बँकांच्या ग्राहकांना युपीआय पेमेंट करताना अडचणी आल्या. अनेकांनी बँक व्यवहार केले की ट्रांझेक्शन फेल असे मेसेज येत होते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या.

सध्याच्या घडीला भारतात साधारण ६० टक्के व्यवहार हे युपीआयद्वारे केले जातात. अशात सर्व्हर डाऊमुळे ग्राहक त्रस्त झाल्याची तक्रार नोंदवत होते. अनेक ग्राहकांनी फंड ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी सोशल मीडियावर नोंदवल्या आहेत. संपूर्ण देशभरात ग्राहकांना युपीआयद्वारे व्यवहार करताना अडचणी येत होत्या.

aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

पेटीएम का अडचणीत?

आरबीआयनं पेटीएम बँकेच्या केलेल्या ऑडिटमध्ये एकाच पॅनकार्डवर अनेक अकाऊंट्स आढळले ज्यांचे व्यवहार संशयास्पद होते. सोबतच अनेक अकाऊंट्समध्ये केवायसी संदर्भात देखील त्रुटी आढळण्याचं कळतं. प्रमोटर कंपनी असलेल्या पेटीएमसोबत अंतर राखून व्यवहार करणं आवश्यक असताना थेट व्यवहार झालेत, ज्यात आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं.

हे पण वाचा- विश्लेषणः आरबीआयने पेटीएमविरोधात केलेल्या कारवाईने तुमच्या पैशाचे काय होणार?

पेटीएम पेमेंट बँक वन ९७ कम्युनिकेशनच्या आयटी पायाभूत सुविधांवर अवलंबत्व अधिक असल्याचं आढळलं. ज्यात अनेक व्यवहार पॅरन्ट कंपनीच्या ॲप्सद्वारे झालेत. पेटीएम पेमेंट बँकेकडून आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यास तातडीनं पावलं टाकण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. सोबतच, पेटीएमच्या सुविधांसाठी पेटीएम पेमेंट बँकेऐवजी दुसऱ्या बँकेद्वारे व्यवहार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.