उच्चजातीय आयोगाची स्थापना केल्याबद्दल बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भाजपच्या शासनावर टीकेची झोड उठवित, जदयूचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी उच्च जातीच्या गरिबांना कोणाताही राखीव कोटा मिळू नये, असे मत मांडले आह़े  चांगली अर्थव्यवस्था त्यांना दारिद्रय़ातून बाहेर काढण्यास समर्थ आहे, असेही त्यांचे म्हणणे आह़े
आरक्षणाची व्यवस्था ही केवळ मागासवर्गीय आणि दलितांसाठीच आह़े  त्यामुळे सवर्णाना कोणत्याही प्रकारचे आरक्षण देण्यात यावे, असे मला वाटत नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केल़े  
उच्च जातीतील गरिबांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि त्यांचे सामाजिक-आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आणि आवश्यकता त्यांना आरक्षण देण्यासाठी बिहार शासनाने स्थापन केलेल्या उच्चजातीय आयोगावर त्यांनी जोरदार टीका केली.

Story img Loader