भारत-पाक नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. सरकारच्या मवाळ धोरणामुळेच पाकिस्तान व चीनकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन व भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याची टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. या मुद्दय़ावरून सुरू झालेल्या गोंधळात संसदेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
भारताचे पाच जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने मंगळवार सकाळपासूनच संसदेच्या दोन्ही सभागृहांतील वातावरण तापले. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी सत्ताधारी यूपीएला धारेवर धरले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी भारताच्या सौम्य भूमिकेवर ताशेरे ओढले. पाकिस्तान आणि चीनकडून नियंत्रण रेषेचे वारंवार उल्लंघन होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी भारताने या दोन्ही देशांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान झालेल्या चर्चेत बोलताना केली. पाकिस्तानी दहशतवादी हाफिझ सईदने जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेचा दौरा केला तेव्हाच भारताने सतर्क व्हायला हवे होते. चीन आणि पाकिस्तान यांनी भारताविरुद्ध हातमिळवणी केली काय, हे संरक्षण मंत्र्यांनी सांगायला हवे. चीन आणि पाकिस्तान भारताच्या
हल्ल्याचे वृत्त विचलित करणारे असून भारताविरुद्ध पाकिस्तानने सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्या सैन्यात, देशात आणि संसदेत पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची कुवत आहे. पण असे प्रत्युत्तर का दिले जात नाही? हल्लेखोर दहशतवादी होते, हे संरक्षण मंत्र्यांना कसे कळले, असे संतप्त सवाल भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केले. सोनिया गांधी यांनी या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला आहे. बदला घेताना भारताने पन्नास सैनिक ठार केल्याशिवाय पाकिस्तानला धडा मिळणार नाही, अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा