UPSC Chairperson Manoj Soni Resigns : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्याचा पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस अंपगत्व आणि ओबीसी नॉनक्रिमीलेयरचे प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच त्यांनी नाव आणि इतर माहिती बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप केला जात आहे.

मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. तसेच प्रशासकीय व्यवस्थेमधील आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अशा उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केले जाते.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Advocate Pralhad Kokare Elected Chairman and CA Yashwant Kasar Vice-Chairman of Cosmos Cooperative Bank
कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी यशवंत कासार
Maharera decided to limit self regulatory body representatives tenure
मक्तेदारी मोडीत काढून टाकण्यासाठी महारेराने घेतला मोठा निर्णय
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांनी एक महिन्यापूर्वीच राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे की नाही? याबाबत मात्र काही निश्चित माहिती मिळालेली नाही. यूपीएससीचे सदस्य होण्यापूर्वी मनोज सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

हे वाचा >> IAS Puja Khedkar : फोटो बदलला, स्वाक्षरी, ईमेल, मोबाईल आणि आई-वडीलांचं नाव बदलून दिली परीक्षा; पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप

यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह

पूजा खेडकर यांचे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक बोगस आयएएस अधिकाऱ्यांची प्रकरणे समोर आली होती. ओबीसी आणि आर्थिक मागस प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी यूपीएससी परीक्षेत लाभ मिळविल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटे अंपगत्वाचे प्रमाणपत्र देऊन यूपीएससीची दिशाभूल केली असल्याचे सांगितले गेल. त्यामुळे यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

कोण आहेत मनोज सोनी?

५९ वर्षीय मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मानले जातात. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधात त्यांचा अभ्यास आहे. सरदार पटेल विद्यापीठात त्यांनी १९९१ ते २०१६ या काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अध्यापन केले. मनोज सोनी यांनी गुजरातमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे २००९ ते २०१५ या काळात कुलगुरूपद भूषविले होते. तसेच बडोद्यातील महाराजा सयाजीराजे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून २००५ ते २००८ या काळात काम पाहिले होते.

Story img Loader