UPSC Civil Services Final Result 2023 Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. २०२३मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

१०१६ उमेदवार झाले UPSC उत्तीर्ण!

यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग – ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – २८, ओबीसी – ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असं होतं.

thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
Supriya Sule Badlapur, Subhash Pawar Prachar,
सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस

आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

कसा पाहाल UPSC चा निकाल?

upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. आपले लॉगइन डिटेल्स इथे भरा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय इथे देण्यात आला आहे.

UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष

UPSC मध्ये उत्तीर्ण झालेले पहिले १० उमेवार

१. आदित्य श्रीवास्तव
२. अनिमेश प्रधान
३. डोनुरू अनन्या रेड्डी
४. पी. के. सिद्धार्थ रामकुमार
५. रुहानी
६. सृष्टी दाबास
७. अनमोल राठोड
८. आशिष कुमार
९. नौशीन
१०. ऐश्वर्यम प्रजापती

२०२१ व २०२२ मध्ये मुलींनी पटकावला होता अव्वल क्रमांक

२०२१मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये श्रुती शर्मानं UPSC परीक्षांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला होता, तर अंकिता अग्रवाल व जेमिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला होता. पाठोपाठ २०२२मध्ये झालेल्या परीक्षांमध्येही तोच कित्ता गिरवला गेला. इशिता किशोरनं देशात पहिला, गरिमा लोहियानं देशात दुसरा, उमा हराथीनं देशात तिसरा तर स्मृती मिश्रानं देशात चौथा क्रमांक पटकावला होता.