जम्मू-काश्मीरमधील तीन मुलींनी यूपीएससी परीक्षेत बाजी मारली असून या परीक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले होते. यूपीएससी परीक्षेत १२३६ उमेदवार पात्र ठरले होते. दक्षिण काश्मीरमधील बिजबेहडा येथील दीबा फरहत, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हयातील रूवेदा सालम, तर जम्मूची प्रयाती शर्मा यांनी यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे.
बसीर उल हक, अफाक गिरी, चौधरी महंमद यासिन, अतार आमीर उल शफी खान, इरफान हाफिज, अंकित कौल यांचाही त्यात समावेश आहे. लागोपाठ सहाव्या वर्षी काश्मीरने यश मिळविले आहे.
रूवेदा सालम ही २०१३ मध्ये आयएएस परीक्षेत यशस्वी होणारी पहिली मुलगी ठरली होती. आताच्या निकालत बसीर उल हक याला ४६ वा, तर प्रयाती शर्मा हिला १३६ वा क्रमांक मिळाला आहे. अंकित कौल याला ४१४, चौधरी महंमद यासिन ४५९, दीबा फरहत ५५३, अथार आमीर उल शफी कान ५६०, इरफान हाफिज ११८३ याप्राणे क्रमांक लागले आहेत. रूवेदा सालम ही यावर्षी पुन्हा परीक्षेला बसली होती, तिचा ८७८ वा क्रमांक लागला आहे.
दीबा ही एम. टेक. झालेली असून २०१२ मध्ये तिने काश्मीर प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. ती प्राथमिक शाळेत असताना तिचे वडील अपघातात मरण पावले, तिची आई सरकारी कर्मचारी असून तिनेच तिला प्रेरणा दिली आहे.

Story img Loader