प्रशिक्षणार्थी (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात अखेर यूपीएससीने कारवाई केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा केला आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. यूपीएससीने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यूपीएससीकडून परिपत्रक जारी

यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यूपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावरील आरोपाची सखोल चौकशी केली असून त्यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचं सिद्ध होत असल्याचे यूपीएससीने या परिपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची निवड का रद्द करू नये? असं प्रश्न विचारत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचंदेखील या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.

bombay high court refuses to stop demolition of five illegal buildings in bhiwandi
बेकायदा घराची कागदपत्रेही अनधिकृतच; भिवंडीतील पाच बेकायदा इमारतींना संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? विचारताच पोलीस अधीक्षकांचं उत्तर; म्हणाले, “मी…”
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित

हेही वाचा – विश्लेषण : अपंगत्व प्रमाणपत्र मिळते कसे? पूजा खेडकरप्रकरणी काय घडले?

यूपीएससीकडे खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप

पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत देशभरातून ८४१ क्रमांक मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

काही दिवसांनी पूजा खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले होते. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा – पूजा खेडकर यांना पोलिसांचे समन्स; छळ प्रकरणात पुण्यात येऊन जबाब नोंदविण्याचे आदेश

गैरवर्तनामुळे पूजा खेडकर यांची बदली

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला होता. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.

Story img Loader