UPSC CSE 2025 Exam Notification : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आज नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२५ साठी अधिसूचना जारी केली आहे. या वर्षी आयोगाने नागरी सेवा परीक्षेसाठी ९७९ जागांसाठी जाहिरात काढली आहे. गेल्या वर्षी आयोगाने १ हजार १०५ पदांसाठी जाहिरात जारी केली होती. ही संख्या गेल्या तीन वर्षआं
भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त जांगामध्ये ३८ पदे ही अपंग उमेदवारांसाठी राखीव आहेत, त्यापैकी तब्बल १२ जागा अंध आणि कमी दृष्टी असलेल्या उमेदवारांसाठी, ७ जागा कर्णबधिर उमेदवारांसाठी असतील. तर १० जागा या सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग बरा झालेले उमेदवार, ड्वॉर्फीज्म (dwarfism), अॅसिड हल्ला पीडित आणि मस्क्यूलर डिस्ट्रॉफी यासारख्ये लोकोमोटर अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी १० रिक्त जागा राखीव असतील आणि नऊ रिक्त पदे ही एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांकडून भरण्यात येतील.
२०२३ मध्ये यूपीएससीन १,१०५ जागा जाहीर केल्या होत्या, तर २०२२ मध्ये हा आकडा १,०११ आणि २०२१ मध्ये ७१२ इतका होता.
upsc.gov.in या वेबसाइटवर परीक्षेसाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. तर उमेदवार ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. UPSC CSE 2025 ची पूर्व परीक्षा २५ मे रोजी होणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाल्यापासून १० दिवसांपेक्षा आधी काढलेला फोटो अपलोड करू नये असे यूपीएससीकडून उमेदवारांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना त्याचा फोटो हा १२ जानेवारी २०२५ च्या नंतर काढलेला आहे का? हे पाहावे लागणार आहे. तसेच फोटोवर उमेदवाराचे नाव आणि फोटो कोणत्या तारखेला काढलेला आहे हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असणार आहे, असेही यूपीएससीकडून सांगण्यात आले आहे.इतकेच नाही तर उमेदवारांच्या चेहर्याने फोटोमधील तीन चतुर्थांश जागा व्यापली पाहिजे.
यूपीएससी सीएसई परीक्षा ही तीन टप्प्यात घेतली जाते. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे उमेदवारांना पार करावे लागतात.
UPSC CSE पूर्व परीक्षेत वस्तुनिष्ठ (objective) प्रश्न विचारले जातात असेल. या परीक्षेत कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येते. मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक (descriptive) पद्धतीची असते आणि यानंतर २२ ऑगस्टपासून पाच दिवसांसाठी आयोजित केले जातील.