केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इरा सिंघलने देशातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पहिल्या चार क्रमांकावर मुली आहेत. इरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्त आणि वंदना राव यांनी घवघवीत यश मिळवले. मुलांमधून सुहर्ष भगत पहिला आला असून, देशभरातून पाचवा आला आहे.  तर महाराष्ट्रातदेखील अबोली नरवणे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या परीक्षेत एकूण १.२३६ उमेदवार उत्तीर्ण झाले असून यामध्ये मुलींनी लक्षणीय यश मिळवले आहे. महाराष्ट्रात अबोली नरवणे ( ७८), स्वप्निल ठेंबे ( ८४), अभिजीत शेवाळे ( ९०), अनिकेत पाटणकर ( ९२) आणि संदीप घुगे ( १०५) यांनी पहिल्या पाचजणांमध्ये स्थान मिळवले आहे.  यूपीएससीच्या १,३६४ पदांसाठी तब्बल ४.५० लाख उमेदवारांनी गेल्यावर्षी २४ ऑगस्ट रोजी देशभरातील २,१३७ ठिकाणी ही परीक्षा दिली होती. यूपीएससीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलाखतीनंतर चार दिवसांत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी १८० जण आयएएस, ३२ जण आयएफएस आणि १५० जण आयपीएससाठी पात्र ठरले आहेत. तर ७१० उमेदवार अ दर्जाच्या आणि २९२ उमेदवारांची ब दर्जाच्या पदांसाठी निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशस्वी उमेदवारांचे मोदींकडून अभिनंदन
“नागरी सेवा परीक्षांमध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन. देशसेवेसाठी माझ्या शुभेच्छा‘ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगातील (यूपीएससी) यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.