नरेंद्र मोदी हे गुजरातमधील २००२च्या दंग्याप्रकरणी दोषी नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता तो मुद्दा नाही असे वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे नेते व रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी केल्याने त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. बिहार भाजपच्या काही नेत्यांनी रामविलास पासवान यांच्याशी युती करण्यास विरोध केला आहे. पासवान भाजपबरोबर जात असतानाच राष्ट्रीय जनता दलात फूट पडली असून १३ फुटीर आमदारांपैकी सातजणांनी नितीश कुमार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपशी आघाडी करण्याबाबतचा निर्णय संसदीय मंडळ घेईल, असे चिराग यांनी स्पष्ट केले. लोकजनशक्ती २००२ पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होते. बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी युतीसाठी लोकजनशक्ती पक्षाची चर्चा सुरू आहे मात्र जागावाटपावरून वाद सुरू असल्याने पक्षात नाराजी असल्याचे चिराग यांनी मान्य केले. बिहार भाजपमध्ये मात्र या युतीस तीव्र विरोध आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. ठोस काही घडले तरच सांगू, असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
पासवान पुन्हा भाजपबरोबर?
काँग्रेसकडून युतीसंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने भाजपशी हातमिळवणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-02-2014 at 01:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upset with congress ram vilas paswans party warms up to bjp son meets rajnath