Gurupurnima 2023 : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भारतात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील भारतीय नागरिक आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सोमवारी अमेरिकेतही भगवद्गीता पारायण यज्ञ या भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तब्बल १० हजार लोकांनी सामूहिक भगवद्गीता पठण केलं आहे.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भारताबाहेर अमेरिकेच्या टेक्सास येथे तब्बल १० हजार लोकांनी सामूहिक भगवद्गीता पठण केलं. गेल्या अनेक वर्षांपासून येथे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. अबालवृद्ध नागरिक टेक्सासच्या अलेन इस्ट सेंटर येथे जमतात आणि सामूहिक भगवद्गीता पठण करतात. भगवद्गीता पारायण यज्ञ या कार्यक्रमाचे योगा संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशन यांनी आयोजित केला होता.
हेही वाचा >> कॅलिफॉर्नियात भारतीय दूतावासावर पुन्हा एकदा हल्ला, अमेरिकेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…
जगप्रसिद्ध धार्मिक गुरू पुज्य गणपती सचिदानंद याच्या उपस्थितीत या सामूहिक भगवद्गीतेचं पठण करण्यात आले. अवधुता दत्ता पिठम ही एक आंतरराष्ट्रीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे. श्री गणपती सचिदानंद स्वामींनी १९६६ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती.
दहा हजार लोकांनी एकत्र येऊन गीतेचं पठण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम येथे आयोजित केला जातो. हिंदू सनातन धर्माची जनजागृती आणि प्रसार व्हावा याकरता या कार्यक्रमाचे अमेरिकेत आयोजन केले जाते.