अमेरिकेत एका दोन वर्षांच्या मुलाने स्वत:च्या आईवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली . यामध्ये या आईचा मृत्यू झाला आहे. आई गाडी चालवत असताना पाठीमागच्या आसनावर बसलेल्या या मुलाने हातातील पिस्तुलाने आईवर गोळ्या झाडल्या. या दुर्घटनेत अन्य कोणीही जखमी झाल नसल्याचे पॅट्रिसच्या भावाने सांगितले. अमेरिकेताल मिल्वॉकी महामार्गावर ही दुर्घटना घडली. पॅट्रिस प्राईस असे या महिलेचे नाव असून मंगळवारी सकाळी निधन झाल्याची बातमी स्थानिक पोलिसांनी दिली. चालकाच्या मागच्या आसनावरुन पोलिसांनी ४० कॅलिबरचे पिस्तुल हस्तगत केले आहे.
दोन वर्षांच्या मुलाने आईवर झाडली गोळी; आईचा मृत्यू
अमेरिकेताल मिल्वॉकी महामार्गावर ही दुर्घटना घडली.
Written by वृत्तसंस्था
Updated:
First published on: 28-04-2016 at 11:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us 2 year old boy fatally shoots mother from the backseat of car