भारतात करोनाची दुसरी लाट आल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे लसीकरण वेगानं व्हावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर केलं आहे. मात्र लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. अमेरिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लस उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यानंतर भारतानं वारंवार अमेरिकेकडे कच्च्या मालाची मागणी केली होती. अखेर अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे.
लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.
United States has identified sources of specific raw material urgently required for Indian manufacture of Covishield vaccine that will immediately be made available for India: US NSA Jake Sullivan to NSA Ajit Doval#COVID19 pic.twitter.com/Df3OpLXQp4
— ANI (@ANI) April 25, 2021
सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यावेळी बोलून दाखवला होता.
Coronavirus – राज्यात दिवसभरात ८३२ रूग्णांचा मृत्यू , ६६ हजार १९१ करोनाबाधित वाढले
गेल्या वर्षी अमेरिकेत करोनाची भीषण लाट आली होती. तेव्हा भारताने हाय़ड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला पाठवली होती. त्यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला विनंती केली होती. भारताने तात्काल विनंतीला मान देत कोट्यवधी गोळ्यांचा पुरवठा केला होता.