इराणपुरस्कृत दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या जॉर्डनवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक मारले गेले होते. त्यामुळे यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. या घटनेला आता चार दिवस उलटत नाहीत तोवर अमेरिकेने डाव साधला आहे. अमेरिकेने शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) दुपारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड (IRGC) आणि दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या इराक आणि सीरियातील ८५ हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. या प्रत्युत्तर हल्ल्यात सीरियामध्ये १८ दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन सैन्याने दहशतवाद्यांशी संबंधित असलेले मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि दारूगोळा स्टोरेज साइट्स आणि इतर ठिकाणांवर हल्ला केला. हल्ला सुरू केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, “तुम्ही एखाद्या अमेरिकनला इजा केली तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.”

हेही वाचा >> जॉर्डनमध्ये अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा परिणाम काय? अमेरिका इराणविरुद्ध कठोर लष्करी कारवाईच्या तयारीत?

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या पहिल्या मोठ्या लष्करी कारवाईत अमेरिकन सैन्याने सीरियातील चार आणि इराकमधील तीन अशा एकूण सात ठिकाणी अतिरेक्यांना लक्ष्य केले. अमेरिकेतील सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सच्या म्हणण्यानुसार, लांब पल्ल्याचा बी-1 बॉम्बर या हल्ल्यात वापरण्यात आला असून यामध्ये सीरियामध्ये १८ इरण समर्थित दहशतवादी मारले गेले आहेत.

जो बायडन यांनी काय म्हटलंय?

“आमचं प्रत्युत्तर आजपासून सुरू झालं आहे. हे प्रत्युत्तर आमच्या निवडणुकीच्या वेळीही सुरू राहील. अमेरिकेला मध्य पूर्व किंवा जगात कोठेही संघर्ष नको. परंतु जे आमचे नुकसान करू इच्छितात त्यांना हे कळू द्या की जर तुम्ही एखाद्या अमेरिकनल नागरिकाला त्रास द्याल तर आम्ही प्रत्युत्तर देऊ”, असं बायडेन यांनी एका निवेदनात सांगितले.

इराणकडून हल्ल्याचा निषेध

दरम्यान, इराणच्या लष्कराने या हल्ल्यांचा निषेध केला असून इशारा दिला आहे की या हल्ल्यामुळे प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. “हे हवाई हल्ले इराकी सार्वभौमत्वाचे उल्लंघन करतात, इराकी सरकारच्या प्रयत्नांना खीळ घालतात आणि त्यामुळे इराक आणि प्रदेशाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात”, असे इराकी लष्कराचे प्रवक्ते याह्या रसूल यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

इराकच्या सैन्याने इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हणून त्यांचा निषेध केल्यानंतर काही मिनिटांनंतर पेंटागॉनने म्हटले की अमेरिकेने हल्ल्यापूर्वी इराकला माहिती दिली. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही हल्ल्यापूर्वी इराकी सरकारला माहिती दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us airstrikes hit over 85 targets in iraq and syria 18 pro iran fighters killed sgk
Show comments