प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर येत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राजपथवरून विमानांच्या उड्डाणास परवानगी न देण्याची म्हणजेच  ‘नो फ्लाय झोन’ची अमेरिकेची मागणी भारताने फेटाळली आहे.
ओबामांच्या भारत दौ-यापूर्वी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा राजपथावरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात आली होती. यावेळी या यंत्रणेने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राजपथवरून विमानांच्या उड्डाणास परवानगी न देण्याची मागणी केली होती. दरम्यान, भारताने ही मागणी फेटाळून लावत परंपरेनुसार विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विमानांचे उड्डाण रद्द केल्यास या दिवशी होणारा पारंपारिक फ्लाय-पास्ट कार्यक्रमदेखील रद्द करावा लागेल. पण, असे करणे शक्य नसल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
बराक ओबामा २५ ते २७ जानेवारीदरम्यान भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते आग्रा येथे जाऊन ताजमहालला भेट देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us asks for a no fly zone over rajpath on r day india says no