‘मंगळयान’ ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताची उत्तुंग झेप तर आहेच पण त्याबरोबरच चीनच्या या क्षेत्रातील स्थानास ‘प्रतीकात्मक धक्का’ देण्याचा हा भारताचा प्रयत्न म्हणायला हवा, अशा शब्दांत अमेरिकेतील सर्व प्रमुख प्रसार माध्यमांनी भारताच्या मंगळमोहिमेचे वर्णन केले आहे. ‘ही मोहीम यशस्वी झाली तर अशाच मोहिमांमध्ये यापूर्वी अपयशी ठरलेल्या चीन आणि जपानसारख्या देशांवर भारताला यामुळे वरचष्मा राखता येईल,’ असे वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये म्हटले आहे. भारताने मिळवलेले यश ही निश्चितच एक अतुलनीय कामगिरी आहे, अशी स्तुतिसुमने चीनमधील प्रसार माध्यमांनीही उधळली आहेत. राजकीय अभ्यासकांनी मात्र या मोहिमेमागे केवळ राजकीय समीकरणे असल्याचा दावा केला आहे.

Story img Loader