अमेरिकेन खासदार (काँग्रेसवुमन) रशिदा त्लाईब यांनी जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “बायडन सरकार पॅलेस्टिनी नागरिकांच्या हत्याकांडासाठी निधी देत आहे आणि गाझातील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्रायलच्या सैन्यावर टाकली,” असा आरोप रशिदा यांनी केला. फॉक्स न्यूजच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी (१८ ऑक्टोबर) एका सभेत बोलताना रशिदा यांना अश्रु अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबावं यासाठी आवाहन केलं.

“जर आपण या घटनेवर रडत नसू, तर काही तरी चुकतंय”

रशिदा त्लाईब म्हणाल्या, “लहान लहान मुलं असलेल्या रुग्णालयावर बॉम्बहल्ला करणं ठीक आहे असा विचार करणारे लोक पाहिले की फार वेदना होतात. काही व्हिडीओंमध्ये लोक लहान मुलांना रडू नका सांगताना दिसतात. ते व्हिडीओ पाहणं कठीण जातं. मात्र, ते रडू शकतात, मी रडू शकते आणि आपण सर्व रडू शकतो. जर आपण या घटनेवर रडत नसू, तर काही तरी चुकत आहे.”

“बायडेन यांनी जागं व्हावं आणि समजून घ्यावं की…”

“मी अध्यक्ष जो बायडेन यांना आत्ताच सांगते की, सगळे अमेरिकन नागरिक तुमच्याबरोबर नाहीत. बायडेन यांनी जागं व्हावं आणि समजून घ्यावं की, आपण हत्याकांड होत असल्याचं बघत आहोत आणि काहीच बोलत नाहीये. आम्ही हे सर्व लक्षात ठेऊ,” असा इशारा रशिदा यांनी बायडन यांना दिला.

हेही वाचा : “मोदी भाजपा-आरएसएसच्या गुंडांचे…”; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न, म्हणाले…

दरम्यान, रशिदा यांनी याआधी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट करत गाझातील रुग्णालयावर इस्रायलने हल्ला केल्याचा आरोप केला होता. तसेच या हल्ल्यात रुग्णालयातील मुलं, रुग्ण आणि डॉक्टर मिळून ५०० जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं.