तुरुंगवासाची शिक्षा लांबणीवर टाकण्याची तसेच जामीन देण्याची विनंती गोल्डमन सॅखचे माजी संचालक रजत गुप्ता यांनी केली आहे. येथील न्यायालय ४ डिसेंबरला त्यांच्या विनंती अर्जावर विचार करणार आहे. प्रतिस्पर्धी कंपनीला गोपनीय माहिती देण्याच्या (इनसाइड ट्रेडिंग) आरोपावरून दोषी ठरलेल्या गुप्ता (६३) यांना फर्मावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची सुरुवात ८ जानेवारी २०१३ पासून होणार आहे. सरकारी वकिलांनी त्यांच्या विनंती अर्जाला आक्षेप घेतला असून, गुप्ता यांना जामिनावर सोडल्यास ते भारतात पलायन करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा