रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील युद्ध सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ झालाय. दोन्ही देशात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्यानं युद्ध सुरूच आहे. जगभरातील अनेक देश हे युद्ध थांबावं म्हणून प्रयत्न करत आहेत. तर, अनेक देशांनी रशियाने युक्रेनवर आंदोलन केल्यामुळे निर्बंध लादले आहेत. अशातच भारताच्या एका भूमिकेवरून अमेरिकेने भारतावर टीका केली आहे.


एका रशियन प्रस्तावावर विचार केल्याने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर टीका केली आहे. भारताची ही भूमिका अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांना कमकुवत करेल, अशी भीती त्यांना वाटतेय. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांनी बुधवारी सांगितले की, “जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. युनायटेड स्टेट्स आणि इतर डझनभर देशांसोबत उभे राहून, युक्रेनियन लोकांसोबत स्वातंत्र्य, युक्रेनियन लोकांसोबत स्वातंत्र्य, लोकशाही आणि सार्वभौमत्वासाठी उभे राहा. राष्ट्रपती पुतीन यांच्या युद्धाला वित्तपुरवठा आणि इंधन आणि मदत करण्यासाठी नाही”, असं त्या म्हणाल्या.

Russia Ukraine War: “जर नरेंद्र मोदी मध्यस्थाची भूमिका घेणार असतील…”, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं


वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांना सांगितले, की प्रणालीचा अहवाल अत्यंत निराशाजनक आहे. तर, लोकशाहीसाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे, अशी गरज त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री डॅन तेहान यांनी बोलून दाखवली.


भारत हा रशियन शस्त्रास्त्रांचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि त्याने रशियाकडून स्वस्त दरात इंधन मागितले आहे. त्याचवेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव ३१ मार्चपासून दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात येत आहेत. रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर सुरू केलेल्या लष्करी कारवाईनंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्यात लावरोव आणि भारत यांच्यादरम्यान सुरक्षेसंदर्भातील महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी रशियावर लादलेले निर्बंध कमकुवत होतील. याशिवाय पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर भारताने रशियाकडून तेलाची खरेदी केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी भारताच्या भूमिकेवरून संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader