पीटीआय, धर्मशाळा / शिमला

तिबेटी नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असून त्यांना आपली संस्कृती आणि धर्माचे मुक्तपणे आचरण करता यायला हवे, असे स्पष्ट मत अमेरिकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष मायकल मॅकॉल यांनी मांडले. चीनचा विरोध डावलून मॅकॉल यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या काँग्रेस सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली.

2 Indian spies expelled from Australia
भारतीय हेरांची ऑस्ट्रेलियातून गुपचूप हकालपट्टी
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
An event organized in Canada on June 23 to commemorate the cowardly terrorist attack in Kanishka Flight 182
‘कनिष्क’ बॉम्बस्फोटाचे कॅनडात स्मरण; निज्जरला श्रद्धांजली वाहिल्यानंतर भारताचेही प्रत्युत्तर
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
New defense pact between Russia and North Korea
रशिया-उत्तर कोरियात नवीन संरक्षण करार

धर्मशाळा येथील मध्यवर्ती तिबेटी प्रशासनाच्या (सीटीए) मुख्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान ‘हाऊस’च्या माजी सभापती नॅन्सी पॅलोसी, सदस्य मॅरिनेट मिलर, ग्रेगरी मिक्स, निकोल मॅलियोटॉकिस, जिम मॅकगनवर्न आणि अॅमी बेरा हे काँग्रेस सदस्य उपस्थित होते. लोकशाहीत नागरिक स्वतंत्र असतात. मात्र निरंकुश सत्तेत ते गुलाम होऊन राहतात, असे सांगत मॅकॉल यांनी चीनच्या हुकुमशाही राजवटीवर नाव न घेता टीका केली. तिबेटी नागरिकांचा स्वतंत्र धर्म, संस्कृती तसेच ऐतिहासिक ओळख आहे. त्यांना भविष्याबाबत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा. त्यामुळेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानाता आपण येथे आलो आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>मोठी बातमी! यूजीसी नेट परीक्षा रद्द; पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती

तिबेट चीनचा भाग नाही’

१३व्या शतकापासून तिबेट चीनचा भाग असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. मात्र तिबेटचे नागरिक, दलाई लामा आणि अमेरिका व तिचे नागरिक अशा सर्वांनाच तिबेट हा चीनचा भाग नसल्याचे माहीत असल्याचे मॅकॉल म्हणाले. अमेरिकन काँग्रेसने तिबेटबाबत विधेयक पारित केले असून त्यानुसार तिबेटी नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.