पीटीआय, धर्मशाळा / शिमला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तिबेटी नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असून त्यांना आपली संस्कृती आणि धर्माचे मुक्तपणे आचरण करता यायला हवे, असे स्पष्ट मत अमेरिकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष मायकल मॅकॉल यांनी मांडले. चीनचा विरोध डावलून मॅकॉल यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या काँग्रेस सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली.
धर्मशाळा येथील मध्यवर्ती तिबेटी प्रशासनाच्या (सीटीए) मुख्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान ‘हाऊस’च्या माजी सभापती नॅन्सी पॅलोसी, सदस्य मॅरिनेट मिलर, ग्रेगरी मिक्स, निकोल मॅलियोटॉकिस, जिम मॅकगनवर्न आणि अॅमी बेरा हे काँग्रेस सदस्य उपस्थित होते. लोकशाहीत नागरिक स्वतंत्र असतात. मात्र निरंकुश सत्तेत ते गुलाम होऊन राहतात, असे सांगत मॅकॉल यांनी चीनच्या हुकुमशाही राजवटीवर नाव न घेता टीका केली. तिबेटी नागरिकांचा स्वतंत्र धर्म, संस्कृती तसेच ऐतिहासिक ओळख आहे. त्यांना भविष्याबाबत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा. त्यामुळेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानाता आपण येथे आलो आहोत, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>मोठी बातमी! यूजीसी नेट परीक्षा रद्द; पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती
‘तिबेट चीनचा भाग नाही’
१३व्या शतकापासून तिबेट चीनचा भाग असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. मात्र तिबेटचे नागरिक, दलाई लामा आणि अमेरिका व तिचे नागरिक अशा सर्वांनाच तिबेट हा चीनचा भाग नसल्याचे माहीत असल्याचे मॅकॉल म्हणाले. अमेरिकन काँग्रेसने तिबेटबाबत विधेयक पारित केले असून त्यानुसार तिबेटी नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.