Deportation Of Indian Citizens From US : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. दरम्यान अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिांना मायदेशी पाठवले होते. आता ते अशा पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवणार आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, त्यांच्या हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

…हे सहन केले जाणार नाही

पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “अमेरिकेने भारताला ४८७ संभाव्य भारतीय नागरिकांबद्दल माहिती दिली आहे, ज्यांना हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आम्ही अमेरिकन प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, माघारी पाठवत असलेल्या भारतीयांशी कोणतेही अमानुष वर्तन सहन केले जाणार नाही. जर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाची माहिती मिळाली तर, आम्ही वरिष्ठ पातळीवर हा मुद्दा उपस्थित करू.”

US Deportation
Illegal Immigration : नावही माहिती नसलेल्या एजंटला दिले ४५ लाख रुपये; सहा महिन्यांचा प्रवास नी मेक्सिको बॉर्डरवरून परत भारतात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Lovepreet Kaur
Illegal Migration: मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत जाण्यासाठी एजंटला दिले १ कोटी रुपये, महिन्याभरात स्वप्नांचा चुराडा
Jaishankar Statement On US Deporting Indians
US Deporting Indians : भारतीयांना परत पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही, राज्यसभेत एस. जयशंकर यांनी सांगितली आकडेवारी
Image Of S Jaishankar
S Jaishankar On Deportation : “परदेशात अवैधपणे…”, अमेरिकेने १०४ भारतीय स्थलांतरितांना माघारी पाठवल्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांचे राज्यसभेत मोठे विधान
US Illegal Immigrants deported
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा
Indian migrants sent back from US news update
अन्वयार्थ : ‘नकोशां’वरून राजकारण…
Amritsar Airport
Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणारे शेकडो भारतीय स्वगृही परतले, महाराष्ट्रातील तीन नागरिकांचाही समावेश!

याशिवाय, परराष्ट्र सचिवांनी पत्रका परिषदेत, बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या टोळ्या आणि नेटवर्क्सविरुद्ध ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या टोळ्या आणि नेटवर्क्सविरुद्ध आपल्याला कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

यापूर्वी १०४ भारतीयांना अमेरिकेने माघारी पाठवले

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याच्या निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. बुधवारी, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. यामध्ये ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

इतर देशातील नागरिकांवरही कारवाई

दरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांवर कारावई करण्याआगोदर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने ब्राझील आणि कोलंबियाच्या अशा शेकडो नागरिकांना मायदेशी पाठवले आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर दोन्ही देशांनी नापसंती दर्शवली होती.

Story img Loader