US Presidential Election Results 2024 Updates, 05 November 2024 : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता मतमोजणीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प विजयी ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २४६ मतांनी आघाडीवर असून कमला हॅरीस १९४ मते मिळाली आहेत. दरम्यान, हळूहळू निकाल स्पष्ट होत असल्याने कमला हॅरीस यांनी रात्री आयोजित केलेली सभा रद्द केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कमला हॅरीस यांचे सल्लागार म्हणाले की, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस इलेक्शन नाईटमध्ये बोलणार नाही. कारण, अद्यापही अनेक मतांची मोजणी बाकी आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी २४६ मते मिळवून आघाडी घेतल्याने कमला हॅरीस यांनी त्यांचा पराभव मान्य केल्याने त्यांनी हे भाषण रद्द केलं असल्याची चर्चा आहे.

Sisamau Bypolls 2024:
Sisamau Bypolls 2024: कानपूरमध्ये सपा उमेदवाराने मंदिरात पूजा केल्याने राजकीय वाद; नसीम सोलंकी यांच्याविरोधात काढला फतवा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Donald Trump Home Hawan
US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात होमहवन; दिल्लीत धर्मगुरूंनी केली प्रार्थना!
Saturday Night Live program
अमेरिकेतील प्रचार अखेरच्या टप्प्यात, कमला हॅरिस लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात ; ट्रम्प यांचा उत्तर कॅरोलिनावर भर
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
trump kamala harris
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण अधिक श्रीमंत? कोणाची संपत्ती किती?

“हॅरीस आज रात्री यूएसमध्ये समर्थकांना संबोधित करणार नाही, परंतु उद्या बोलण्याची अपेक्षा आहे”, असे सह-अध्यक्ष सेड्रिक रिचमंड यांनी सांगितले. सीएनएनच्या वृत्ताच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. आज सकाळी रणांगणातील सातपैकी दोन राज्यांमध्ये ट्रम्प यांना विजयी ठरल्यानंतर हे जाहीर करण्यात आले. एका मेळाव्याला संबोधित करताना रिचमंड म्हणाले की, मतांची मोजणी व्हायची आहे आणि काही राज्यांना बोलावले गेले नाही. “आमच्याकडे अजूनही मते मोजायची आहेत. आमच्याकडे अजूनही अशी राज्यांमध्ये मतमोजणी झालेली नाही. प्रत्येक मताची मोजणी होईल, प्रत्येक आवाज मोजला जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही रात्रभर लढत राहू.”

हेही वाचा >> US Election Results 2024 Live Updates: कमला हॅरीस यांना अमेरिकन महिलांची ५४ टक्के मतं; वाचा कुणाला कुणाची किती मतं मिळाली!

अमेरिका निवडणूक निकालाची स्थिती काय?

उत्तर कॅरोलिनामध्ये विजय मिळवल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियामध्येही विजय मिळवला आहे. ॲरिझोना, जॉर्जिया, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या सात स्विंग राज्यांचे निकाल पुढील अमेरिकन अध्यक्ष कोण होणार हे प्रभावीपणे ठरवतील. एडिसन रिसर्चच्या अंदाजानुसार ट्रम्प २४६ इलेक्टोरल मतांसह आघाडीवर आहेत, तर डेमोक्रॅट कमला हॅरिस १९४ मतांसह पिछाडीवर आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते.

एग्झिट पोलनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाजूने ४४ टक्के जनमत

लोकशाहीचे संवर्धन आणि बळकटीकरण करणे हा कमला हॅरिस यांचा प्रचारातील मुख्य मुद्दा होता. एग्झिट पोलनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाजूने ४४ टक्के जनमत आहे. २०२० साली ट्रम्प यांच्या बाजूने ४६ टक्के जनमत होते. यंदा त्याच्यात थोडीशी घसरण झाली आहे. मंगळवारी अमेरिकेतील कोट्यवधि मतदारांनी देशाच ४७ वा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी मतदान केले.

प्रचारादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी मध्यम वर्गाला दिलासा देण्यावर भर दिला. अमेरिकेतील १०० दशलक्ष लोकांना दिलासा देण्यासाठी कर सवलत देणे, परवडणारी घरे देणे, महिलांच्या गर्भपातावरील बंदी उठविण्यासारखी आश्वासने कमला हॅरिस यांनी दिली आहेत.

दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची घोषणा केली आहे. विदेशी वस्तूंवर अधिक कराची आकारणी, ऊर्जा निर्मितीमधील खर्च कमी करणे, अशा प्रकारची आश्वासने ट्रम्प यांनी दिली आहेत.