US Presidential Election Results 2024 Live Updates, 05 November 2024: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आजचं मतदान व त्यानंतरचे निकाल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकन जनतेचा कौल आज मतपेट्यांमध्ये होतोय बंद, जागतिक महासत्तेची सूत्रं कुणाच्या हाती?

18:45 (IST) 5 Nov 2024
US Election 2024 Live Updates in Marathi: विजयासाठी किती मतांची आवश्यकता?

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला २७० मतांची आवश्यकता आहे. यासाठी प्रामुख्याने अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वानिया आणि विस्कॉन्सिन या राज्यांमधील मतं महत्त्वाची भूमिका बजावतील.

18:42 (IST) 5 Nov 2024
US Election Results 2024 Live Updates: न्यू हॅम्पशायरमधील मतदानाची दृश्ये

न्यू हॅम्पशायरमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळपासूनच मतदानासाठी अमेरिकन नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली.

https://x.com/therealbatjay/status/1853787257888493716

17:56 (IST) 5 Nov 2024

US Election Results 2024: आत्तापर्यंत मतदान सुरू झालेली राज्ये...

फ्लोरिडा

जॉर्डजिया

इलिनॉईज

लुसियाना

मेरिलँड

मॅसेच्युसेट्स

मिशिगन

मिसुरी

पेनसिल्वानिया

ऱ्होड आयलँड

साऊथ कॅरोलिना

वॉशिंग्टन डीसी

17:54 (IST) 5 Nov 2024

US Election Results Live: ‘व्हाइट हाऊस’साठी अटीतटीची लढाई; अमेरिकेत आज मतदान, ट्रम्प-हॅरीस यांच्यात चुरस

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे.

वाचा सविस्तर

17:52 (IST) 5 Nov 2024
आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरिस यांचा भारताशी काय आहे संबंध? भारतीय मूल्यांशी कशी झाली ओळख?

कमला हॅरिस या आफ्रिकन-अमेरिकन म्हणून स्वतःची ओळख सांगत असल्या तरीही त्यांच्यावर भारतीय संस्कारही झाले आहेत. त्यांच्या आई भारतीय असल्याने भारतीय माध्यमांत भारतीय वंशांच्या कमला हॅरिस असं संबोधलं जातं. त्यामुळे त्यांचं भारताशी नेमकं काय कनेक्शन आहे हे पाहूयात.

सविस्तर लेख वाचा

17:48 (IST) 5 Nov 2024

US Election Results Live: इंडियाना व केंटकीमध्येही मतदानाला सुरुवात

अधिक राज्यांमध्ये मतदान केंद्रे उघडली आहेत, ज्यात न्यूयॉर्क आणि इंडियानाचा समावेश आहे. कनेक्टिकट, इंडियाना, केंटकी, मेन, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि व्हर्जिनिया येथील मतदार आता मतदान करत आहेत.

17:18 (IST) 5 Nov 2024

US Election Results Live: इंडियाना व केंटकीमध्येही मतदानाला सुरुवात

इंडियाना आणि केंटकीमध्ये मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली गेली, परंतु काही सेंट्रल टाइम झोनमध्ये सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली जातील.

17:16 (IST) 5 Nov 2024

न्यू हॅम्पशायरमधील छोट्या डिक्सविल नॉच टाउनशिपमध्ये मध्यरात्री मतदान झाले, अनेक दशकांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार; उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येकी तीन मते मिळाली.

17:16 (IST) 5 Nov 2024

जवळपास सर्व मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली, परंतु ५०० लोकसंख्येच्या कमी असलेल्या ठिकाणांमध्ये ते सकाळी १० वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार)उघडू शकतात.

17:16 (IST) 5 Nov 2024

इंडियाना आणि केंटकीमध्ये मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार)उघडली गेली, परंतु काही सेंट्रल टाइम झोनमध्ये सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार)उघडली जातील.

17:15 (IST) 5 Nov 2024

US Election Results Live: स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात

आठ राज्यांमधील मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली, ज्यात कनेक्टिकट, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, न्यू हॅम्पशायर आणि व्हर्जिनिया यांचा समावेश आहे.

17:09 (IST) 5 Nov 2024

US Election Results Live: न्यूयॉर्क, व्हर्जिनियामध्ये मतदानाला सुरुवात

हॅम्पशायरपाठोपाठ न्यूयॉरक व व्हर्जिनियासह एकूण ८ राज्यांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.

17:08 (IST) 5 Nov 2024

US Election Results Live: हॅम्पशायरमध्ये पहिलं मत टाकलं गेलं!

अमेरिकेतील प्रचंड चर्चेतील अध्यक्षीय निवडणुकीत पहिलं मत अमेरिकेच्या हॅम्पशायरमध्ये टाकलं गेलं. अमेरिकेत भारताप्रमाणे इव्हीएम मशीन नसून बॅलट पेपर पद्धत मतदानासाठी वापरली जाते. त्यानुसार हॅम्पशायरमध्ये पहिलं मतदान बॅलट पेपरवर करण्यात आलं आहे.

Kamala Harris vs Trump Presidential Debate

कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर शाब्दिक युद्ध झालं. (AP Photo)

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणूक मतदानासंबंधीचे सर्व अपडेट एका क्लिकवर!