US Presidential Election Results 2024 Updates, 05 November 2024: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आधी मतदान व त्यानंतरचे निकाल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकन जनतेचा काय आहे कौल? जागतिक महासत्तेची सूत्रं कुणाच्या हाती?
Barack Obama on US Election Vote Counting Process: बराक ओबामांचा अमेरिकेच्या जनतेला संदेश!
बराक ओबामांचं अमेरिकी जनतेला आवाहन. म्हणाले, “२०२० मध्ये मतमोजणीसाठी अनेक दिवस लागले होते. यावेळीही इतक्यात निकाल कळतील असं चित्र दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे व्यक्त होण्याआधी काही गोष्टी ध्यानात घ्या. या निवडणुकीसाठी देशभरात हजारोंच्या संख्येनं निवडणूक कर्मचारी काम करत आहेत. त्यांचा आदर राखा, त्यांना धन्यवाद द्या. पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट शेअर करू नका. मतमोजणीच्या प्रक्रियेला पूर्ण व्हायला वेळ द्या. प्रत्येक मत मोजण्यासाठी वेळ लागतो”!
It took several days to count every ballot in 2020, and it’s very likely we won’t know the outcome tonight either. So please keep a few things in mind as you make your voice heard today:
— Barack Obama (@BarackObama) November 5, 2024
– Thousands of election workers around the country are working hard today. Respect them.…
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: डोनाल्ड ट्रम्प वेस्ट व्हर्जिनियातून विजयी
अमेरिकेत मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल कमला हॅरीस यांच्या बाजूने दिसत आहेत. मात्र, असं असलं तरी आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली असून वेस्ट व्हर्जिनिया प्रांतातून डोनाल्ड ट्रम्प यांना किमान ४ मतं आत्तापर्यंत मिळाली आहेत. त्यामुळे इथे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: महत्त्वाच्या राज्यांमधलं मतदान संपलं!
अमेरिकेत भारतीय प्रमाणवेळेनुसा मंगळवारी संध्याकाळी मतदानाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटेपर्यंत केंटकी, इंडियाना, साऊथ कॅरोलिना, व्हरमाँट, व्हर्जिनिया व स्विंग स्टेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉर्जियामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
US Election 2024 Live : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिकच्या उमेदवार कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होत आहे. मात्र, जर या निवडणुकीत कमला हॅरिस निवडणूक जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील.
एडिसन रीसर्चच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांनी लोकशाहीचं संरक्षण व आर्थिक स्थिती या बाबी सर्वात महत्त्वाच्या असल्याचं मत व्यक्त केलं. हे प्रमाण जवळपास एक तृतीयांश इतकं होतं. त्याशिवाय गर्भपात आणि अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतर या बाबी अनुक्रमे १४ टक्के व ११ टक्के मतदारांना महत्त्वाच्या वाटल्या. विशेष म्हणजे फक्त २५ टक्के मतदारांना अमेरिकेतील लोकशाही सुरक्षित आहे असं वाटतंय!
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत एकीकडे पहिल्या एक्झिट पोलमध्ये कमला हॅरीस यांना ४८ टक्के मतांचा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी दुसरीकडे अमेरिकन जनता मात्र लोकशाही धोक्यात असल्याची प्रतिक्रिया देत आहे. एडिसन रीसर्चनं केलेल्या मतदानोत्तर चाचणी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांपैकी ७३ टक्के मतदारांनी हे मत व्यक्त केलं आहे.
US Election 2024 Live : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे जर त्यांचा या निवडणुकीत विजय झाला तर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील.
US Election 2024 Live Updates: ट्रम्प यांचा पाठिराखा एलॉन मस्कनं टेक्सासमध्ये केलं मतदान
डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीत पाठिंबा देणारा स्पेसएक्सचा प्रमुख एलॉन मस्कनं टेक्सासमध्ये मतदानाचा हक्क बजावला
Just voted in Cameron County, Texas, home of Starbase! pic.twitter.com/dE8oRGlI4p
— Elon Musk (@elonmusk) November 5, 2024
US Election 2024 Live Updates: जॉर्जियामधून डोनाल्ड ट्रम्प यांना आघाडी
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉर्जिया प्रांतामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरीस यांच्यावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे जॉर्जियातून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
US Election 2024 Live Updates in Marathi: एक्झिट पोल्समध्ये कमला हॅरीस यांची बाजी!
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरीस यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मतदान चालू होतं. बुधवारी पहाटे आलेल्या एक्झिट पोलच्या पहिल्या अंदाजानुसार कमला हॅरीस यांना ४८ टक्के अमेरिकन नागरिकांनी पसंती दिली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हेदेखील फारसे मागे नसून त्यांच्या पारड्यात ४४ टक्के मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे.
US Election 2024 Live Updates in Marathi: जॉर्जियामध्ये १० मतदान केंद्रांवर बॉम्ब ठेवल्याची धमकी!
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत बॉम्बच्या अफवेनं स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी गदारोळ दिसून आला. निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा जॉर्जियामधील १० मतदानकेंद्रांवर बॉम्ब ठेवल्याच्या अफवेनं गोंधळ उडाला. सर्व ठिकाणी तपास व शोधमोहीम राबवल्यानंतर एफबीआयनं ही बॉम्ब ठेवल्याची धमकी केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं.
US Election 2024 Live Updates in Marathi: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत आहे. यावेळी राष्ट्राध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी मतदारांना एक आवाहन केलं. “आज मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपला आवाज ऐका आणि मतदान करा”, असं त्यांनी म्हटलं आहे.
US Election 2024 Live Updates:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये मतदान केलं आहे. पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासमवेत त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, विजय निश्चित होईल अशा दृढ विश्वास आहे. मला खूप आत्मविश्वास वाटतो. मी ऐकलं आहे की, आम्ही चांगलं सपोर्ट मिळत आहे.”
US Election 2024 Live Updates: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये मतदान केलं आहे. पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासमवेत त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.
US Election 2024 Live Updates: सुनीता विलिम्स यांनीही मतदानाचा हक्क बजावला
US Election 2024 Live Updates: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुनीता विल्यम्स यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. सुनीता विल्यम्स या अंतराळातूनच स्पेसमधून मतदान केलं आहे. अंतराळवीरांना मतदान करता येण्यासाठी तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार सुनीता विल्यम्स यांनी मतदान केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
US Election 2024 Live Updates: कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत
US Election 2024 Live Updates: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत कमला हॅरिस व माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आमने-सामने आहेत. कमला हॅरिस आणि माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत मानली जात आहे. त्यामुळे आता अमेरिकेची जनता कोणाला कौल देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
US Election 2024 Live Updates: रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात चुरशीची निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे भवितव्य आज ठरत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी अमेरिकेत आज मतदान पार पडत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.
US Election 2024 Live : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक पार पडत आहे. मतदान पार पडत आहे. काही राज्यात मतदान सुरू झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? कोण मारणार बाजी? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात अमेरिकेत चुरशीची निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे भवितव्य आज ठरत असून अमेरिकेत मतदान पार पडत आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. या निवडणुकीत अंतराळवीर सुनीता विल्सम्स यांनीही आपलं मतदान केलं आहे.
रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात अमेरिकेत चुरशीची निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे भवितव्य आज ठरत असून अमेरिकेत मतदान पार पडत आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी पहिली मतपत्रिका न्यू हॅम्पशायरमध्ये टाकण्यात आली. हॅरिस आणि ट्रम्प यांना डिक्सव्हिल नॉचच्या छोट्या न्यू हॅम्पशायर समुदायात प्रत्येकी तीन मते मिळाली आहे.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी जनतेला संदेश दिला आहे. “आज मतदानाचा दिवस आहे. लाखो अमेरिकी नागरिक घराबाहेर पडून मतदान करतील आणि जगाला दाखवतील की आपण कोण आहोत, कोणत्या मूल्यांसाठी आपण उभे आहोत. तुम्ही सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान करा”, असं या पोस्टमध्ये बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. या पोस्टसह त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.
Today is Election Day.

Millions of Americans will be going to the polls to show the world who we are and what we stand for. Find out where and when you can vote today at https://t.co/NKXRGNgbZX.
And once you do, I want to see your voting sticker. I’ll be sharing your posts… pic.twitter.com/JwRuT2s08s
US Election Results 2024: तीन डझन भारतीय वंशाच्या उमेदवारांचा समावेश!
अमेरिकेतील निवडणुकीत तब्बल तीन डझनहून जास्त भारतीय वंशाच्या उमेदवारांचा समावेश आहे. विशेषत: कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. याच भागातून रो खन्ना, डॉ. अॅमी बेरा व उपाध्यक्षा व विद्यमान उमेदवार कमला हॅरिस हे सदस्यदेखील अमेरिकन संसदेवर निवडून गेले आहेत.
US Election Results 2024: टेक्सस आणि विस्कॉन्सिनमध्येही मतदानाला सुरुवात
निम्म्या अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली असून १० मतांचा कोटा असणाऱ्या टेक्सस व विस्कॉन्सिनमध्येही मतदारांनी मतदान केंद्रांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. त्याव्यतिरिक्त अॅलाबामा, आयओवा, कन्सास, मिनेसोटा, मिसिसिपी, नॉर्थ डकोटा, ओक्लाहोमा आणि साऊथ डकोटा या भागांमध्येही मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला २७० मतांची आवश्यकता आहे. यासाठी प्रामुख्याने अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वानिया आणि विस्कॉन्सिन या राज्यांमधील मतं महत्त्वाची भूमिका बजावतील.
न्यू हॅम्पशायरमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळपासूनच मतदानासाठी अमेरिकन नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली.
https://x.com/therealbatjay/status/1853787257888493716
US Election Results 2024: आत्तापर्यंत मतदान सुरू झालेली राज्ये…
फ्लोरिडा
जॉर्डजिया
इलिनॉईज
लुसियाना
मेरिलँड
मॅसेच्युसेट्स
मिशिगन
मिसुरी
पेनसिल्वानिया
ऱ्होड आयलँड
साऊथ कॅरोलिना
वॉशिंग्टन डीसी
US Election Results Live: ‘व्हाइट हाऊस’साठी अटीतटीची लढाई; अमेरिकेत आज मतदान, ट्रम्प-हॅरीस यांच्यात चुरस
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे.
कमला हॅरिस या आफ्रिकन-अमेरिकन म्हणून स्वतःची ओळख सांगत असल्या तरीही त्यांच्यावर भारतीय संस्कारही झाले आहेत. त्यांच्या आई भारतीय असल्याने भारतीय माध्यमांत भारतीय वंशांच्या कमला हॅरिस असं संबोधलं जातं. त्यामुळे त्यांचं भारताशी नेमकं काय कनेक्शन आहे हे पाहूयात.
US Election Results Live: इंडियाना व केंटकीमध्येही मतदानाला सुरुवात
अधिक राज्यांमध्ये मतदान केंद्रे उघडली आहेत, ज्यात न्यूयॉर्क आणि इंडियानाचा समावेश आहे. कनेक्टिकट, इंडियाना, केंटकी, मेन, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि व्हर्जिनिया येथील मतदार आता मतदान करत आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणूक मतदानासंबंधीचे सर्व अपडेट एका क्लिकवर!