US Presidential Election Results 2024 Updates, 05 November 2024: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आधी मतदान व त्यानंतरचे निकाल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकन जनतेचा काय आहे कौल? जागतिक महासत्तेची सूत्रं कुणाच्या हाती?
US Election Results Live: इंडियाना व केंटकीमध्येही मतदानाला सुरुवात
इंडियाना आणि केंटकीमध्ये मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली गेली, परंतु काही सेंट्रल टाइम झोनमध्ये सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली जातील.
न्यू हॅम्पशायरमधील छोट्या डिक्सविल नॉच टाउनशिपमध्ये मध्यरात्री मतदान झाले, अनेक दशकांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार; उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येकी तीन मते मिळाली.
जवळपास सर्व मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली, परंतु ५०० लोकसंख्येच्या कमी असलेल्या ठिकाणांमध्ये ते सकाळी १० वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार)उघडू शकतात.
इंडियाना आणि केंटकीमध्ये मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार)उघडली गेली, परंतु काही सेंट्रल टाइम झोनमध्ये सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार)उघडली जातील.
US Election Results Live: स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात
आठ राज्यांमधील मतदान केंद्रे सकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उघडली, ज्यात कनेक्टिकट, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, न्यू हॅम्पशायर आणि व्हर्जिनिया यांचा समावेश आहे.
US Election Results Live: न्यूयॉर्क, व्हर्जिनियामध्ये मतदानाला सुरुवात
हॅम्पशायरपाठोपाठ न्यूयॉरक व व्हर्जिनियासह एकूण ८ राज्यांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.
US Election Results Live: हॅम्पशायरमध्ये पहिलं मत टाकलं गेलं!
अमेरिकेतील प्रचंड चर्चेतील अध्यक्षीय निवडणुकीत पहिलं मत अमेरिकेच्या हॅम्पशायरमध्ये टाकलं गेलं. अमेरिकेत भारताप्रमाणे इव्हीएम मशीन नसून बॅलट पेपर पद्धत मतदानासाठी वापरली जाते. त्यानुसार हॅम्पशायरमध्ये पहिलं मतदान बॅलट पेपरवर करण्यात आलं आहे.
कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर शाब्दिक युद्ध झालं. (AP Photo)
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणूक मतदानासंबंधीचे सर्व अपडेट एका क्लिकवर!