Six Indian Americans win elections of US House of Representatives in US Election Results 2024 : एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असताना जगभरात अमेरिकेच्या निवडणुकीची चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असून अमेरिकेने सहा भारतीयांनाही स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून संधी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात मराठमोळ्या श्री ठाणेदार यांचाही समावेश आहे. ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. याआधी अमेरिकेत पाच अमेरिकन- भारतीय वंशाचे उमेदवार सिनेट सदस्य म्हणून निवडून आले होते. आता ही संख्या सहावर गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हर्जिनिया आणि संपूर्ण ईस्ट कोस्टमधून निवडून येणारे वकिल सुहास सुब्रमण्यम हे त्या भागातील पहिले भारतीय अमेरिकन स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह ठरले आहेत. स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह हे पद भारतातील आमदाराच्या समकक्ष असते. सुब्रमण्यन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक क्लॅन्सी यांचा पराभव केला. ते सध्या व्हर्जिनिया राज्याचे सिनेटर आहेत.

“व्हर्जिनियाच्या १० व्या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला याबाबत मी आभारी आणि नम्र आहे. हा जिल्हा माझे घर आहे. मी येथे लग्न केले आहे, माझी पत्नी मिरांडा आणि मी येथे आमच्या मुलींचे संगोपन करत आहोत आणि आमच्या समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या आमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आहेत. वॉशिंग्टनमध्ये या जिल्ह्याची सेवा करत राहणे हा सन्मान आहे”, असं सुब्रमण्यम म्हणाले. सुब्रमण्यम यांनी यापूर्वी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे व्हाईट हाऊस सल्लागार म्हणून काम केले होते. ते हिंदू असून देशभरातील भारतीय अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

हेही वाचा >> US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!

ते काँग्रेसमधील ‘समोसा कॉकस’ मध्ये सामील झाले. यामध्ये सध्या पाच भारतीय अमेरिकन आहेत. अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार. सर्व पाच विद्यमान भारतीय अमेरिकन सदस्य प्रतिनिधीगृहात पुन्हा निवडून आले आहेत. तसंच, सुब्रमण्यमही निवडून गेल्याने आता त्यांची संख्या सहा झाली आहे. तर, ॲरिझोनाच्या पहिल्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमध्ये डॉ. अमिश शाह हे कमी फरकाने आघाडीवर असल्याने प्रतिनिधीगृहात भारतीय अमेरिकन लोकांची संख्या सातपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

श्री ठाणेदार यांचा पुन्हा विजय

श्री ठाणेदार हे मिशिगनच्या १३ व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून सलग दुसऱ्यांदा निवडून आले. २०२३ मध्ये ते पहिल्यांदा ही निवडणूक जिंकली होती. तर, राजा कृष्णमूर्ती यांनी सलग पाचव्यांदा इलिनॉयचा सातवा काँग्रेसनल जिल्हा जिंकला आहे. त्याचप्रमाणे कॅलिफोर्नियाच्या सतराव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रो खन्ना आणि काँग्रेस वुमन प्रमिला जयपाल या वॉशिंग्टन राज्यातील सातव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.

व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. अमी बेरा हे २०१३ पासून कॅलिफोर्नियाच्या सहाव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ भारतीय अमेरिकन काँग्रेस सदस्य आहेत. ते सलग सातव्यांदा पुन्हा निवडून आले. तर, ऍरिझोनामध्ये, डेमोक्रॅटिक पक्षाचे शाह विरोधक डेव्हिड श्वेकेट यांच्यापेक्षा थोडे पुढे होते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us election results 2024 six indian americans win elections of us house of representatives united states presidential polls sgk