अल-कायदाने दिलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने सर्व विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. २२ ठिकाणचे दूतावास सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याच्या आदेशाबरोबरच जगभरातील अमेरिकन नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा इशारा अल-कायदाने दिला आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ओबामा प्रशासनाने देशातील सर्व विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. तसेच या व्यवस्थेवर स्वत: अध्यक्ष बराक ओबामा बारकाईने नजर ठेवून आहेत.

Story img Loader