अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं २२ महिन्यांच्या बंदीनंतर आज पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. यावर डोनाल्प ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा परतण्यास रस नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचं वृत्त ‘रॉयटर्स’नं दिलं आहे. ट्रम्प यांचं खातं पुन्हा सुरू करण्याबाबत पोलवर मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर ट्विटरनं त्यांचं खातं पुन्हा सुरू केलं आहे.

Elon Musk: ट्विटरकडून नवं ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरण जाहीर, “बोलण्याचं स्वातंत्र्य असेल पण…”, एलॉन मस्क यांचं ट्वीट

“ट्विटरवर परतण्याचं कारण दिसत नाही”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप’ (टीएमटीजी) या त्यांच्याच स्टार्टअपने हे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप ट्विटरपेक्षा चांगलं असून यावर युजर्संची जास्त रेलचेल असल्याचा दावा ट्रॅम्प यांनी केला आहे. आगामी २०२४ मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प लढणार आहेत.

विश्लेषण: ट्विटरमध्ये राजीनामासत्र का सुरू आहे? एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलं?

डोनाल्ड ट्रम्प यांचं खातं पुन्हा सुरू करण्यात यावं, असा कौल पोलवर ५१.८ टक्के युजर्संनी दिला होता. “जनतेनं सांगितल्याप्रमाणे ट्रम्प यांचं खात पुन्हा सुरू करण्यात येईल”, असं ट्वीट एलॉन मस्क यांनी आज पहाटे केलं होतं. त्यानंतर लगेच ट्रम्प यांचं खातं सक्रीय करण्यात आलं. हे ट्वीट करताना मस्क यांनी एका लॅटिन म्हणीचा वापर केला आहे. ‘वॉक्स पॉप्युली, वोक्स डेई’ अर्थात लोकांचा आवाज म्हणजेच देवाचा आवाज, असं मस्क म्हणाले आहेत.

Promoted to Dad! मुलीबरोबर राहता यावं म्हणून पित्याने सोडली मोठ्या पगाराची नोकरी

दरम्यान, ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू असतानाच शनिवारी एलॉन मस्क यांनी नवं ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरण जाहीर केलं आहे. त्याचबरोबर काही बंद खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही ट्विटरनं घेतला आहे. “नकारात्मक आणि द्वेषयुक्त ट्विट्स काढून टाकले जातील. अशा ट्विट्सच्या जाहिराती ट्विटर चालवणार नाही. जोपर्यंत ट्विट्स विशेषत: शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत ते सापडणार नाहीत”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. हे नियम केवळ वैयक्तिक ट्विटला लागू असून संपूर्ण खात्याला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.