युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रशियावर नव्याने र्निबध लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केली. अमेरिकेसह युरोपियन संघातील देशांनीही रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेत र्निबध लादण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जगभरातून विरोधाचे वातारवरण तयार होत असतानाही रशियाने आक्रमक भूमिका कायम ठेवली असून क्रेमलिन समर्थकांनी आणखी एका शहरावर कब्जा मिळवला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सध्या आशियाई देशांच्या दौऱ्यावर आहेत. रशियावरील र्निबधांबाबत फिलिपाइन्स येथे बोलताना ओबामा म्हणाले की, शीतयुद्धानंतर पूर्व आणि पश्चिम देशांत तणावाचे वातावरण निर्माण करण्यास रशिया जबाबदार असून अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर दबाव वाढावा म्हणून उच्च तंत्रज्ञानयुक्त मालासह अन्य महत्वाच्या घटकांच्या निर्यातीवर र्निबध लादण्याचा निर्णय घेतल्याचे ओबामा यांनी सांगितले.
रशियावर सध्या लादण्यात आलेल्या र्निबधांमुळे तणाव निवळला नाही तर पुढील टप्प्यात बॅंकींगसारख्या इतर महत्वाच्या क्षेत्रातही र्निबध लादण्याचा विचार केला जाईल,असेही ओबामा म्हणाले.
रशियावर लादण्यात आलेल्या र्निबधांअंतर्गत मालमत्ता गोठवणे तसेच  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परदेशी प्रवासावर बंदी घालण्याचा विचार आहे. तर दुसरीकडे युरोपियन संघातील प्रतिनिधींची ब्रसेल्स येथे बैठक झाली. या बैठकीतही रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी युरोपियन समुदायातर्फे र्निबध लादण्याबाबत निर्णय घेतला. युक्रेन मुद्दय़ावर रशियाच्या १५ वरिष्ट अधिकाऱ्यांवर र्निबध लादण्याच्या विचारात आहेत. तर अमेरिकेनेही पुतिन यांच्या निकटच्या अधिकाऱ्यांवर र्निबध लादण्याबाबत विचार करीत आहे.
दरम्यान, रशियावर र्निबध लादण्याच्या मुद्दय़ावर युरोपियन संघातील काही सदस्यांमध्येही मतभेद आहेत. कारण अनेक देशांचे आर्थिक हितसंबंध रशियासोबत गुंतलेले असल्यामुळे थेट र्निबधाची कारवाई करण्यापूर्वी राजनैतिक तोडग्याचा प्रयत्न करावा,असे एका पाश्चिमात्य राजनैतिक अधिकाऱ्याने नमूद केले आहे.
रशियावर र्निबध लादण्याचा निर्णय घेणाऱ्या अमेरिका तसेच युरोपियन संघांनी या देशाच्या ऊर्जा क्षेत्रासह महत्त्वाच्या उद्योगांवरही र्निबध न लादण्याची भूमिका घेतल्याचे अमेरिकी अधिकारी आणि पश्चिमी राजनैतिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा