जगभरातील हवाई कंपन्यांच्या सेवांमध्ये दिमाखात सामील होणाऱ्या ड्रीमलायनर विमानांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक दोषांमुळे ड्रीमलायनर धावपट्टीवरच स्थिरावले आहेत. आता त्यातील तांत्रिक दोषांची चाचपणी करण्यासाठी अमेरिकेचे हवाई सुरक्षा अन्वेषक बोइंगच्या उपकंत्राटदारांच्या कारखान्यांची तपासणी करणार आहेत.
जपान एअरलाइन्स तसेच जपानच्याच ऑल निप्पॉन एअरलाइन्स या दोन्ही हवाई वाहतूक कंपन्यांच्या ताफ्यात असलेल्या ड्रीमलायनर विमानांचे अलीकडेच इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. कॉकपीटमध्येपायलटच्या आसनाखाली असलेल्या बॅटरीतून धूर आल्यामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. अन्य एका ठिकाणी विमानाच्या इंजिनानेच पेट घेतल्याचे स्पष्ट झाले होते तर अन्य एका घटनेत कॉकपीटच्या पुढील भागातील काचेलाच तडा गेल्याचे आढळून आले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर बोइंग कंपनीला बॅटरींचा पुरवठा करणाऱ्या सेक्युअरप्लेन आणि प्रॅट व व्हिटनी पॉवर या दोन अमेरिकी कंपन्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
 या दोन्ही कंपन्यांचे प्रकल्प अनुक्रमे टक्सॉन आणि फिनिक्स या शहरांमध्ये आहेत. याशिवाय जीएस युआसा या जपानी कंपनीकडेही बोइंगच्या बॅटऱ्या बनवण्याचे कंत्राट आहे.
हवाई सुरक्षा अन्वेषकांचे एक पथक या कंपन्यांची चौकशी करणार असून बॅटऱ्यांची तपासणी करणार आहे. त्यातील मेमरीही डाऊनलोड करून त्याचे पृथक्करण प्रयोगशाळेत केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा