तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात धुमाकूळ घालत आहेत. तालिबान्यांनी देशातील ६० टक्के भूप्रदेशावर ताबा मिळवल्याची चर्चा आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारी परतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले. तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे. आता फक्त राजधानी काबूल शिल्लक आहे. काबुलनंतर कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, अफगाणिस्तानमधील झपाट्याने बदलणारी परिस्थिती आणि तालिबानची पकड मजबूत झाल्यामुळे अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका तालिबानचा सामना करण्यासाठी नाही तर अमेरिका आपल्या दूतावासातील कर्मचारी, नागरिक आणि विशेष व्हिसा अर्जदारांना तेथून निघून जाण्यासाठी मदत करण्यासाठी ३००० पेक्षा जास्त सैन्य पाठवणार आहे. हे सैनिक काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असतील. हे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांच्या परत येण्यास मदत करेल आणि त्यांना विमान सुविधा आणि सुरक्षा प्रदान करेल.

तालिबानचे पुढील लक्ष्य काबूल

अफगाणिस्तानवर तालिबानची पकड हळूहळू मजबूत होत आहे. तालिबानचे पुढील लक्ष्य काबूल असेल. कंदाहारमध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय छायाचित्रकार दानिशची तालिबानने हत्या केली होती. गुरुवारी तालिबानने कंदाहारवर ताबा मिळवण्यापूर्वी आणखी दोन प्रांतीय राजधानी गझनी आणि हेरातवर ताबा मिळवला. तालिबान काबूलपासून अवघ्या १३० किमी अंतरावर आहेत. अशाप्रकारे, दहशतवादी संघटनेने आतापर्यंत १२ प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. गझनीमध्ये अतिरेक्यांनी पांढरे झेंडे फडकवले. दोन स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराबाहेरील लष्करी आणि गुप्तचर तळावर अजूनही तुरळक लढाई सुरू आहे.

भारताने अफगाणिस्तान सैन्याला भेट दिलेलं Mi-24 हेलिकॉप्टर तालिबानच्या ताब्यात

दरम्यान, अशावेळी लढण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे काय हे अफगाणी नेतृत्वाला ठरवायचे असल्याचे व्हाइट हाऊसने बुधवारी सांगितले. गेली दोन दशके आपण ज्यांना प्रशिक्षण दिले, त्या अफगाणी राष्ट्रीय दलांजवळ लढण्यासाठी क्षमता आणि युद्धसाहित्य असल्याचे बायडेन प्रशासनाने सांगितले.