Israel – Hamas News in Marathi : इस्रायलकडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात हल्ले चालूच आहेत. इस्रायलचे लष्कर शिफा रुग्णालयाच्या तळात असलेल्या ‘हमास कमांड सेंटर’चा मागोवा घेत आहे. इस्रायलने केलेल्या आरोपानुसार हा तळ हमास रुग्णालयाच्या तळघरात आहे. मात्र, ‘हमास’ आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कमांड सेंटर येथे नसल्याचे स्पष्ट केले आहे. गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरू असल्याने येथे मानवतावादी मदत पोहोचू शकत नाही. परिणामी अनेक नागरिक मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलने युद्धविश्रांती घ्यावी अशी मागणी जगभरातून केली जात होती. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा करार झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसने वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्यानुसार म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाझामध्ये ओलिस ठेवलेल्या डझनभर महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी अमेरिका, इस्रायल आणि हमास यांनी तात्पुरता करार केला आहे. यानुसार युद्ध पाच दिवस थांबू शकणार आहे. वॉशिंग्टन पोस्टने या कराराशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरून हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा >> रुग्ण, कर्मचारी, विस्थापितांचे शिफा रुग्णालयातून स्थलांतर; इस्रायलचे दक्षिण गाझातील लक्ष्यांवर हल्ले

युद्ध विश्रांतीसाठी सहा पानांचा करार झाला आहे. करारातील अटींनुसार युद्धातील सर्व पक्ष किमान पाच दिवसांसाठी लढाऊ ऑपरेशन्स थांबवतील. तसंच, दर २४ तासांनी लहान तुकड्यांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक ओलिसांना सोडलं जाईल, असं या करारानुसार ठरलं आहे. पोस्ट या वृत्तस्थळाने ही म्हटलं आहे की, युद्धविश्रांतीमुळे महत्त्वपूर्ण मानवतावादी मदत मिळण्याची अपेक्षा आहे, हवाई पाळत ठेवून त्याचे निरीक्षण केले जाईल. गाझामध्ये कैदेत असलेल्या २३९ लोकांपैकी किती लोकांना या करारानुसार सोडण्यात येईल, याबाबत स्पष्टता झालेली नाही. याबाबत व्हाईट हाऊस किंवा इस्रायली पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ओलिसांची सुटका पुढील काही दिवसांत सुरू होऊ शकते. त्याच्या कराराशी परिचित लोकांच्या मते ७ ऑक्टोबर रोजी हमासने सुमारे २४० ओलिस ताब्यात घेतले आहेत. तर यामध्ये १२०० इस्रायली आणि ११ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. युद्धाची सर्वाधिक झळ लहान मुले आणि महिलांना बसली आहे.