ओक क्रीक गुरुद्वारात गेल्या वर्षी झालेल्या गोळीबारात बळी पडलेल्यांसाठी ओबामा प्रशासनाने ५० कोटी डॉलरहून अधिक मदत जाहीर केली आहे. विस्कॉनसीन येथील गुरुद्वारात झालेल्या गोळीबारात सहा शीख भविक ठार झाले होते, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे चार दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.न्याय विभागाने विस्कॉनसीन न्याय विभागाला तातडीचे अनुदान म्हणून जवळपास ५० कोटी रुपयांहून अधिक डॉलरचे अनुदान मंजूर केले आहे. त्याचप्रमाणे बळी पडलेल्यांचे आप्तेष्ट आणि हल्ल्यातून बचावलेल्यांच्या मानसिक आणि आरोग्यसेवेसाठी यापुढेही मदत देण्यात येईल, असे अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी ब्लॉगवर जाहीर केले आहे.
बळी पडलेल्यांचे कुटुंबीय, साक्षीदार, पहिले प्रतिवादी आणि ओक क्रीक समाजाच्या मदतीसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Story img Loader