अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी सध्या तैवान दौऱ्यावर आहेत. पेलोसी यांच्या दौऱ्यावर चीनने गंभीर आक्षेप घेतला असून पेलोसी यांचा तैवान दौरा म्हणजे शांतता आणि स्थिरतेला धोका आहे. स्वतंत्र तैवानची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी कारवायांचा चीन कठोर विरोध करतो, असे चीनने म्हटले आहे.
हेही वाचा >> उमर खालिदच्या याचिकेवर पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी
‘एक-चीन’ हा सिद्धांत चीन आणि अमेरिका संबंधाचा राजकीय पाया आहे. तैवान स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी कारवायांना चीन विरोध करतो. तसेच या प्रकरणात बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपालाही चीनचा विरोध आहे, असे भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते वांग शिओजियान यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा >> विमानतळावरील विचित्र अपघात टळला, कार आली थेट विमानाच्या खाली
तसेच पेलोसी यांची तैवाना भेट म्हणजे चीनच्या अंतर्गत ढवळाढवळ आहे. हा दौरा म्हणजे शांतता आणि तैवानमधील स्थिरतेला धोका आहे. या दौऱ्यामुळे चीन आणि अमेरिकेच्या संबंधांवर गंभीर परिणाम होतील,” असेही वांग शिओजियान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >> करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाह यांचं मोठं विधान
जे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करतील, ते नष्ठ होतील. तैवानला सातत्याने भेट देण्याचा प्रयत्न केला तसेच चीनला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर उत्तरादाखल कठोर प्रतिकार केला जाईल. तसेच गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास अमेरिकेने तयार रहावे,” असा इशाराही वांग शिओजियान यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.
हेही वाचा >> अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या ठार, तालिबानकडून तीव्र शब्दांत निषेध
दरम्यान, अमेरिकी नेते तसेच अधिकाऱ्यांची तैवानला भेट म्हणजे तैवानच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकाचा पाठिंबा असल्याचे चीनकडून गृहित धरले जाते. मात्र तैवानला भेट दिली म्हणजे आम्ही आम्ही तैवान स्वातंत्र्याचा पाठपुरावा केला असा त्याचा अर्थ होत नाही, असे अमेरिकेने चीनला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन-अमेरिका यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.